agriculture news in Marathi, Develop a mobile app for farmers: Collector Dr. Chaudhary | Agrowon

शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित करावे ः जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 मे 2019

सांगली ः ‘‘कृषिविषयक विविध योजनांची माहिती देणारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मोबाईल ॲप विकसित करावे’’, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत जिल्हा नियामक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस. जी. फाळके आदी अधिकारी उपस्थित होते. 

सांगली ः ‘‘कृषिविषयक विविध योजनांची माहिती देणारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मोबाईल ॲप विकसित करावे’’, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिल्या.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत जिल्हा नियामक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस. जी. फाळके आदी अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘‘कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करता यावी, यासाठी शेतकऱ्यांना दिशा मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सांगली जिल्ह्याची पीक परिस्थिती आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गरज ओळखून मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक माहिती, कीड नियंत्रण, प्रशिक्षण, यशकथा यांची माहिती मिळणे शक्य होईल. तसेच, शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होईल. हे ॲप यूझर फ्रेंडली असावे, जेणेकरून ते ग्रामीण भागातील व सामान्य शेतकऱ्यांनाही वापरता येईल.’’

त्याचबरोबर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे व प्रबोधन करावे. तसेच, सेंद्रिय शेतीमाल विकण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या सेंद्रिय जत्रा या मॉलचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. ई मार्केटिंग, होम डिलिव्हरी आदींबाबत तसेच, स्थानिक मॉलमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी समन्वय साधावा, असे त्यांनी सूचित केले. तसेच, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी नवीन शेतीप्रयोगांकडे वळण्यासाठी अनुषंगिक मार्गदर्शन करावे. 

आगामी वर्षाचे नियोजन करताना प्रत्येक शेतकरी गटाशी जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. कृषी व मत्स्य, रेशीम विकास, पशुसंवर्धन आदी कृषिपूरक सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अन्य अनुषंगिक बाबींसाठी साह्य करा. तसेच, कृषी व फळ प्रक्रियेवरही भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.  

या वेळी कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यावस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक...अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई...
मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणीऔरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत...
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
जुन्नरमध्ये निकृष्ट बियाणेप्रकरणी...पुणे ः यंदा खरीप हंगामात निकृष्ट दर्जाचे बियाणे...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
संशोधनातून शेतकऱ्यांना डिजिटल शेतीसाठी...परभणी : ‘‘विविध विषयातील शास्त्रज्ञांनी एकत्र...
सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः...यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...