स्वतंत्र एकात्मिक शेती मॉडेल विकसित करा : डॉ. पी. जी. इंगोले

स्वतंत्र एकात्मिक शेती मॉडेल विकसित करा : डॉ. पी. जी. इंगोले
स्वतंत्र एकात्मिक शेती मॉडेल विकसित करा : डॉ. पी. जी. इंगोले

जालना : बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या मदतीने लहान, मध्यम शेतकऱ्यांसाठी कोरवडवाहू, बागायती परिस्थीतीसाठी स्वतंत्र एकात्मिक शेती पद्‌धती मॉडेल करावे, अशी सुचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांनी खरपूडी कृषी विज्ञान केंद्रास केली.

खरपूडी कृषी विज्ञान केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजय बोराडे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, विद्यापिठाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, जिल्हा रेशीम कार्यालयाचे व्ही. एम. भांगे, जिल्हा परिषद पशुसंवर्धनचे डॉ. दर्शन काकडे, समाजकल्याण विभागाचे एन. टी. दखानी, देवानंद सानप, महिलाआर्थिक विकास महामंडळाचे मुकूंद जहागिरदार, बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. जे. ई. जहागिरदार, कृषी विद्यपिठाचे तंत्र अधिकारी डॉ. जी एस. कोते, शेतकरी प्रतिनिधी उद्धवराव खेडेकर आदी उपस्थित होते.

केंद्राने जून २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान केलेल्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. एप्रील २०१९ ते मार्च २०२० साठी कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. मागील बैठकीतील सुचना व त्यावरील कार्यवाहीचा लेखाजोखा सादर करण्यात आला.

डॉ. इंगोले म्हणाले, की गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी बी. टी. कपाशीची पेरणी पाच जुननंतरच करावी. मृदशास्त्र विभागाने जमीनीचा सुपीकता नकाशा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीबीएफनेच करावी.

बोरडे म्हणाले, की रेशीम, बांबू, सुगंधी गवत आणि चारा उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांबू शेतीतून सीएनजी गॅस उत्पादनाचा केव्हीकेचा मानस आहे. शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांना सोलर पॅनलद्वारे सौर उर्जा निर्मीतीची संधी द्यावी. वृक्ष लागवडीसाठी त्यांना कार्बन क्रेडीट देण्यात यावे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com