Agriculture news in Marathi, Developing cluster for pomegranate; Meeting in the Union Agriculture Ministry | Agrowon

डाळिंब क्‍लस्टरसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयात बैठक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

सोलापूर ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने अखिल भारतीय फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रातील डाळिंबाचे वाढते उत्पादन लक्षात घेता डाळिंबाची उत्पादकता आणि गुणवत्ता, या विषयावर अधिक भर राहिला. त्यातून स्वतंत्र क्‍लस्टर डेव्हलप करणे व डाळिंबाच्या रेसिड्यू फ्रीमधील अडचणी लक्षात घेऊन काही बदल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

सोलापूर ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने अखिल भारतीय फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रातील डाळिंबाचे वाढते उत्पादन लक्षात घेता डाळिंबाची उत्पादकता आणि गुणवत्ता, या विषयावर अधिक भर राहिला. त्यातून स्वतंत्र क्‍लस्टर डेव्हलप करणे व डाळिंबाच्या रेसिड्यू फ्रीमधील अडचणी लक्षात घेऊन काही बदल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

कोरडवाहू शेतीसाठी किफायतशीर ठरलेल्या डाळिंबाची उत्पादकता, गुणवत्ता आणि निर्यातवृद्धीसाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रायलयाने पुढाकार घेतला असून, नुकतीच नवी दिल्ली येथे कृषी मंत्रालयाने अखिल भारतीय फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात डाळिंबासह आंबा, केळी, द्राक्षाच्या फळ बागातयदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मुद्द्या‌वर झाली चर्चा
डाळिंबाचे सध्या भगवा वाण सर्वाधिक वापरले जाते. या वाणाचा रंग चांगला आहे, चवही आहे. पण, अन्य स्पर्धक देशांच्या तुलनेत पुरेसा आकार नाही. त्यामुळे नव्या वाणावर आणखी काम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, डाळिंबाच्या निर्यातीत रेसिड्यू फ्री डाळिंबासाठी सध्या सात फंगीसाइडस्‌ना निर्यातीत मान्यता आहे. पण, याशिवाय आणखी सुमारे ४० फंगीसाडस्‌ची अडचण आहे. त्यांच्या चाचण्या घेऊन त्यालाही मान्यता मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा या चाचण्या अधिक खर्चिक आहेत, तो खर्च कोणी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला. पण त्याबाबत संशोधन केंद्र, औषधे तयार करणाऱ्या खासगी कंपन्या यांच्याशी समन्वय ठेवून काय करता येईल, हे पाहू, असे आश्‍वासन कृषी सचिवांनी दिले. याशिवाय प्रक्रिया उद्योग आणि क्‍लस्टर डेव्हलपमेंटवर चर्चा झाली. त्यानुसार काही ठिकाणे त्यासाठी निश्‍चित करण्यात आली आहेत. तसा प्रस्ताव तयार आहे.

कृषी मंत्रालयापुढे आम्ही आमच्या अडचणी मांडल्या आहेत. क्‍लस्टर डेव्लपमेंटच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा झाली. लवकरच त्यावर काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पण मुळात नवीन वाणाची निर्मिती, प्रक्रिया उद्योगाला चालना आणि निर्यातीतील अडचणीवर तातडीने काम होण्याची गरज आहे. 
-प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...