वाणांच्या संवर्धनासाठी जागतिक दर्जाची सीड बॅंक उभारा : मुनगंटीवार

वाणांच्या संवर्धनासाठी जागतिक दर्जाची सीड बॅंक उभारा : मुनगंटीवार
वाणांच्या संवर्धनासाठी जागतिक दर्जाची सीड बॅंक उभारा : मुनगंटीवार

नागपूर : पारंपरिक वाण लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वाणांचे संवर्धन करण्यासाठी जागतिक दर्जाची सीड बॅंक तयार करावी आणि त्यासाठीचा आराखडा तयार करुन शासनाला पाठवावा, अशी सुचना अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सातव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारग, महापौर नंदा जिचकार, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेशकुमार अग्रवाल, जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर, सदस्य सचिव अश्रफ,, डॉ. आर.पी. शनवारे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. अधिकराव जाधव उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, ‘‘जैवविविधता मंडळाने गेल्या सात वर्षात उल्लेखनीय कार्य केले. जैविक संसाधनाच्या व्यवसायिक वापरातून होणारा आर्थिक लाभ समित्यांना होणे गरजेचे आहे. जैवविविधता संवर्धनाच्या प्रक्रियेत निधीची कमतरता सरकार भासू देणार नाही‘‘ खारगे यांनी ५० कोटी वृक्ष लागवड, महाराष्ट्र राज्य रणनिती व कृती आराखडा, जैवविविधता अधिनियमाची वैशिष्टये, त्या अंतर्गंत स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारे फायदे, सागरी किनाऱ्यावरील जैवविविधता याबाबत माहिती दिली.

मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची सात वर्षातील सोनेरी वाटचाल' या पुस्तकाचे विमोचन झाले. जैवविविधता संवर्धनाच्या प्रक्रियेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. चंद्रपूर जिल्हयातील दहा ग्रामपंचायतींनी जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना केल्यामुळे या समित्यांच्या संचलनाकरीता त्यांना २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com