कारखाना विस्तारासाठी आता इथेनाॅलची अट : देवेंद्र फडणवीस

किसनवीर कारखाना
किसनवीर कारखाना

सातारा: राज्यातील साखर कारखान्यांनी यापुढे कारखाना विस्ताराची मागणी केल्यास इथेनाॅल निर्मितीची अट घालण्यात येणार आहे. तसेच राज्यातील दहा हजार गावांतील विकास सोसायट्या कृषी उद्योगामध्ये (अॅग्री बिझेनस) परावर्तित करण्याचे काम सरकार करीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. म्हावशी (जि. सातारा) येथील खंडाळा सहकारी कारखान्याच्या को-जन प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यात हार्वेस्टरचा वापर कमी प्रमाणात होत असताना किसनवीर उद्योग समूहात मात्र हार्वेस्टर २५ टक्के वापर होत आहे, ही चांगली बाब आहे. हार्वेस्टरचा भविष्यात जास्त उपयोग करावा लागेल. यासाठी राज्य शासन हार्वेस्टरला ४० लाख रुपये अनुदान देत आहे. ऊस अर्थकारणातून शेतकऱ्यांना स्थैर्य लाभले आहे. साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात १९०० रुपयांपेक्षा कमी आहेत. उसाचे भाव ठरविण्याचा अधिकार हा कायद्याने आपल्या समितीला आहे. गेल्या हंगामात राज्यात ९९ टक्के एफआरपी आम्ही दिली आहे. इतर कोणत्याही राज्यात इतकी एफआरपी दिलेली नाही.   ‘‘राज्यातील दहा हजार गावांतील सोसायट्या कृषी उद्योगामध्ये परावर्तित करण्याचे कामे सरकार करीत आहे. यातून शेतकरी व सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य मिळणार अाहे. तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन दरवर्षी ६७ हजार कोटी रुपये गुंतवणूक करत आहे,’’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच ‘‘यापुढे साखर कारखान्यांनी विस्ताराची मागणी केल्यास इथेनॉलची अट घातली जाणार आहे. किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाने घेतलेला पुढाकार अनुकरणीय आहे,’’ असेही ते म्हणाले सुभाष देशमुख म्हणाले, की गाव व शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत मेक इन महाराष्ट्र यशस्वी होणार नाही. दहा हजार सोसायट्याच्या मार्फत कृषी उद्योगामुळे संस्था व शेत सक्षम होईल. या वेळी चंद्रकांत पाटील यांचे भाषण झाले. मदनदादा भोसले यांनी आपल्या प्रस्ताविकात कारखाना, तसेच इथेनाॅल प्रकल्पास येत असलेल्या अडचणी मांडल्या. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख, पाणी पुरवठामंत्री बबन लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, शेखर चरेगावकर, अविनाश महागावकर, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, बी. जी. पवार, विक्रम पावस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मदनदादा जनतेच्या विचाराने चालणारा नेता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मदन भोसले यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबतच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, की मदनदादा हे जनतेच्या विचाराने चालणारे नेते आहे. लोकांच्या भावना काय आहेत, त्या त्यांनी आताच पहिल्या आहेत. यामुळे मदनदादा उचित निर्णय घेतील. साखरेचे विक्री मूल्य वाढीसाठी पाठपुरावा भविष्यात साखरेवर अवलंबून राहून चालणार नाही. साखरेवरील ताण इथेलाॅन कमी करू शकतो. आजवरच्या इतिहासात साखरेचे किमान विक्री मुल्य ठरवण्याचा निर्णय या केंद्र सरकारने प्रथमच घेतला आहे. साखरेचे किमान विक्री मूल्य २९०० रुपये ठरविले आहे. त्यामुळे एफआरपी देणे शक्य झाले. हे किमान विक्री मूल्य  ३१०० ते ३२०० रुपये करा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com