समुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

नगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून हा वाद कायमचा मिटवला जाईल. त्यासाठी केलेल्या योजनेचा आराखडा तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव येथे सभा झाली. या वेळी गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व  डॉ. सुजय विखे यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  मुख्यमंत्री म्हणाले,  की राज्यात दुष्काळ आणि अवर्षनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. जलयुक्त शिवार अभियान यातून सिंचनाची मोठी कामे केली. तसेच शेततळी विहिरी देऊन सिंचन आणण्याचा प्रयत्न केला. नीळवंडे धरणाच्याचा कालव्या साठी पैसा दिला. तसेच कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. नगर- नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावर सातत्याने संघर्ष होत असतो. त्यामुळे गोदावरी  खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यातेन समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवण्यात येईल.   सरकारचा हा प्रयत्न आहे आम्ही तो प्रयत्न सरकार यशस्वी करणार असून त्यासाठीचा आराखडा तयार केलेला आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगर -नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा कायमचा संघर्ष संपणार आहे. राज्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.  विखे म्हणाले कोल्हेंना निवडून आणणार  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणार असल्याचे स्पष्ट केले. या मतदारसंघांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांचे भाऊ राजेश परजने अपक्ष लढत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com