agriculture news in Marathi, Devendra Fadnveis says, controversy will solve by moving water witch going to Ocean, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

समुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून हा वाद कायमचा मिटवला जाईल. त्यासाठी केलेल्या योजनेचा आराखडा तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवून हा वाद कायमचा मिटवला जाईल. त्यासाठी केलेल्या योजनेचा आराखडा तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव येथे सभा झाली. या वेळी गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व  डॉ. सुजय विखे यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले,  की राज्यात दुष्काळ आणि अवर्षनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. जलयुक्त शिवार अभियान यातून सिंचनाची मोठी कामे केली. तसेच शेततळी विहिरी देऊन सिंचन आणण्याचा प्रयत्न केला. नीळवंडे धरणाच्याचा कालव्या साठी पैसा दिला. तसेच कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. नगर- नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावर सातत्याने संघर्ष होत असतो. त्यामुळे गोदावरी  खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यातेन समुद्राला वाहून जाणारे पाणी वळवण्यात येईल.  

सरकारचा हा प्रयत्न आहे आम्ही तो प्रयत्न सरकार यशस्वी करणार असून त्यासाठीचा आराखडा तयार केलेला आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगर -नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा कायमचा संघर्ष संपणार आहे. राज्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

विखे म्हणाले कोल्हेंना निवडून आणणार 
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गृहनिर्माण राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणार असल्याचे स्पष्ट केले. या मतदारसंघांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांचे भाऊ राजेश परजने अपक्ष लढत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...
मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका...मुंबई : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी...
परभणीत काकडी ५०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक...पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेपासून केवळ २० किमी...
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...