शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत: फडणवीस

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत: फडणवीस
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत: फडणवीस

तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची स्मारके त्यांच्या कार्याची प्रेरणा देणारी आहेत. जाती-पातीचे राजकारण करण्याऐवजी समता आणि बंधुता घेऊन जनजेचा विकास हा महत्त्वाचा आहे. पुलवामा येथे दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले आहेत, या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासन प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तासगाव येथे शुक्रवारी (ता. १५) यांनी केली. तासगाव (जि. सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, माजी आमदार रमेश शेंडगे, राजेंद्र देशमुख, दीपक शिंदे, नीता केळकर यांच्यासह जिल्ह्यातील आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या माध्यमातून सामाजिक सुसंवाद साधणारा असा उपक्रम राबवून विविध जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणून प्रत्येक धर्माचे झेंडे एकत्र आणून आगळावेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. भारत एक श्रेष्ठ देश आहे. काहीजण जाती-पंथांच्या नावावर जनतेमध्ये दुफळी निर्माण करत आहेत.  ते म्हणाले, पुलवामा येथे दहशदवाद्यांनी हल्ला केल्याने संपूर्ण देश पेटून उठला आहे. पाकिस्तानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान देश हा भिकारी झाला आहे. हा नवीन भारत आहे. आम्ही उत्तर देणार आहे. या हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या पाठीशी १२५ कोटी जनता आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये देणार आहे. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भाषणे झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com