धानाला ५०० रुपये बोनस ः मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा ः धानाला ५०० रुपये बोनस आणि ५०० हेक्‍टरपर्यंतच्या तलावाची मासेमारीकरिता लीज माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. परिणय फुके, राजेश काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांची या वेळी उपस्थिती होती.  मुख्यमंत्री पुढे म्हणाले, धानाला यापूर्वी अवघा २०० रुपये बोनस दिला जात होता. त्यात वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्याची दखल घेत यावर्षी धानाला ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भाच्या इतिहासात अभूतपूर्व असा निधी आपल्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी दिला. साडेचार वर्षांत ५० हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. भंडारा गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. तलावांची लीज कमी करण्याची मागणी येथील मासेमारी संस्थांची होती. त्यांनाही दिलासा देत ५०० हेक्‍टर क्षमता असलेल्या तलावांसाठी आता लीज आकारली जाणार नाही. ५०० ते १००० हेक्‍टरसाठी ६०० तर १००० हेक्‍टरवरील तलावांसाठी ९०० रुपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थांनाच देण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com