सर्वांगीण समतोल विकासाचे धोरण स्पष्ट : मुनगंटीवार

सर्वांगीण समतोल विकासाचे धोरण स्पष्ट : मुनगंटीवार
सर्वांगीण समतोल विकासाचे धोरण स्पष्ट : मुनगंटीवार

मुंबई ः   अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातून शेतकरी, महिला आदी सर्वच क्षेत्रातील घटकांना न्‍याय देत सर्वस्पर्शी लोक कल्याणकारी आणि देशाच्या विकासाची गती वाढवणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून सरकारचे सर्वांगीण-समतोल विकासाचे धोरण स्‍पष्‍ट झाले आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधीच्‍या माध्‍यमातून २ हेक्‍टर जमीनधारक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्‍याचा संकल्‍प जाहीर करून `किसानों के सन्‍मान में केंद्र सरकार मैदान में` ही भावना खऱ्या अर्थाने दाखवून दिली आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला आणि सर्वसमावेश सामाजिक प्रगतीला वेग देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांचे अभिनंदन. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री शेतीला अच्छे दिन येणार : पाशा पटेल गावाच्या दिशेने निघालेला अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहे. ही मदत शेतकऱ्यांची पेरणी खर्च निघणारा असल्याने दिलासा मिळणार आहे, तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या माध्यमातून शेतीमध्ये पशुधन टिकणार आहे. पशुधन शेतीत टिकून सेंद्रिय शेतीला चालना मिळणार आहे. यामुळे दर्जेदार अन्नधान्य ग्राहकांना मिळणार आहे. ही पुढील पिढ्यांची काळजी सरकारने केली आहे. मत्स्यउद्योगांसाठीच्या कर्जावरील व्याजदरात ५ टक्के सवलत दिली आहे, ही आनंदाची बाब आहे. महामार्ग निर्माणामध्ये भारत जगात क्रमांक एकचा देश बनला असताना, आता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ग्रामीण रस्ते विकसित होणार आहेत. यासाठी ९० हजार कोटींची तरतूद केली आहे. इंधनाच्या बाबतीत आपण वर्षाला ८ लाख कोटींचे खनिज तेल आयात करतो. आता हा खर्च वाचणार असून बांबू, ज्वारी, शेतीतील कचरा याद्वारे जैवइंधन निर्मितीचे धोरण केल्याने हे ८ लाख कोटींची थेट गुंतवणूक शेतीत होणार आहे. यामुळे शेतीला अच्छे दिन येणार आहेत. -पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com