कुणाच्या विरोधासाठी नाणार रद्द करणार नाही ः मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई: नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प हा कुणाचा विरोध आहे म्हणून रद्द करणार नाही. तसेच प्रकल्प रद्द करण्यासाठी आपल्यावर कुणाचाही दबाव नाही, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केला.  नाणार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण विभागाच्या परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या रिफायनरी प्रकल्पावरून अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. भाजपने शिवसेनेशी युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट मान्य केल्याचे बोलले जाते. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध आहे तर स्थानिक भाजप नेते प्रकल्पाच्या बाजूने आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द न करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे जठार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळाने नाणार प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने नाणार प्रकल्पाबाबत सद्सद्विवेकबुद्धीने विचार करावा, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात भाजपचे आमदार प्रसाद लाड, भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, कोकण जनकल्याण प्रितष्ठान राजापूरचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आदींचा समावेश होता. शिवसेना मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... दरम्यान, नाणार रिफायनरीचे समर्थन करणारे शिष्टमंडळ विधान भवनात येणार असल्याची माहिती समजल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी याच अधिवेशनात नाणारची अधिसूचना रद्द होणार असल्याचा दावा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com