Agriculture news in marathi In Devgaon, citrus cuttings are stolen from animals | Agrowon

देवगावात मोसंबीची कलमे जनावरांकडून फस्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

दोन दिवसांपूर्वीच लागवड केलेली मोसंबीची जवळपास ४०० कलमे जनावरांनी फस्त केली. यामुळे एक वर्षाचे नुकसान झाले. शिवाय पीक घेण्याचे काम लांबणीवर पडले. नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी. 
- सोमीनाथ गीते, शेतकरी, देवगाव, ता. पैठण 

पावसाळ्यातच तळ ठोकून राहणारी ही मोकाट जनावरे कपाशीला बोंड ठेवत नाही. कायम नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. निवेदन देऊन आम्ही थकलो. पण, बंदोबस्त होईना. 
- दीपक जोशी, शेतकरी, देवगाव, ता. पैठण 
 

औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील असलेल्या देवगाव येथील एका शेतकऱ्याची मोसंबीची कलमे मोकाट जनावरांनी रात्रीतून फस्त केली. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुकाअंतर्गत येत असलेल्या देवगाव लगतच्या थापटी तांडा जवळील ई क्लास जमिनीतील झाडीत पावसाळ्यात जवळपास दीडशेच्यावर मोकाट जनावरांचा मुक्काम असतो. त्यांचा उपद्रव कापूस वेचणी संपेपर्यंत देवगाव, देवगाव तांडा, थापटी तांडा, रजापूर, आदी गावांतील पिकांना मोठ्या प्रमाणात होतो. या विषयी चार ते पाच वर्षांपासून जिल्हा प्रशासनासह वन विभागाकडे देवगाव सह परिसरातील गावचे ग्रामस्थ निवेदने देत आहेत. परंतु, त्यांच्या निवेदनाला प्रतिसाद देण्याचे काम प्रशासन व संबंधित यंत्रणेकडून होत नसल्याची स्थिती आहे. 

परिणामी, चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी येणारी पिके फस्त करण्याचे काम मोकाट जनावरे करीत आहेत. २७ जूनच्या मध्यरात्री देवगाव येथील सोमीनाथ गिते यांच्या शेतातील जवळपास दोन दिवसापूर्वी लागवड केलेली मोसंबीची चारशे कलमे या मोकाट जनावरांनी फस्त केली. वारंवार दाद मागूनही या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग व प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. निदान शासनाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

जीव धोक्यात घालून जागरण 

थापटी तांडा परिसरात असलेल्या दाट झाडीत पावसाळ्याच्या सुरुवातीला ही मोकाट जनावरे येऊन तळ ठोकतात. तिथूनच दिवसा झाडीत आराम व रात्री त्यांचे परिसरातील विविध गावातील पिकांवर आक्रमण सुरू असते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री जागरण करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...