agriculture news in Marathi devise formula for dual pricing for sugar Maharashtra | Agrowon

साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार करा

कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

दुहेरी दर धोरणात सध्या असलेल्या ५ टक्क्यांऐवजी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या साखरेवर वेगवेगळा कर आकारता येऊ शकतो. तसेच, दोन्ही ग्राहकांसाठी साखर विक्री करताना वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर करता येईल. 
— प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण ठरविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यानुसार घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर ठरविण्यासाठी सूत्र तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने अन्न मंत्रालयाला केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

साखरेच्या दुहेरी दर धोरणात औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचे दर जास्त असतील तर घरगुती वापरासाठीचे दर कमी असतील. यामुळे संकटातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देऊ शकत नाहीत. 

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, की साखरेच्या दुहेरी दर धोरणामुळे बॅंकांकडे साखर गहाण ठेवून त्यावर व्याज देण्यापासून कारखान्यांची सुटका होण्यास मदत होईल. ६० ते ७० टक्के साखर जर जास्त दराने विकली तरी कारखान्यांची कॅश फ्लो वाढून त्यांना बॅंकांकडे जाण्याची गरज पडणार नाही. कारखाने स्वतः त्यांचा निधी उभारू शकतील. 

साखरेच्या एकूण वापरापैकी आइक्रिम उत्पादन, शीतपेय उत्पादक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात ६५ टक्के साखर वापरली जाते. या उद्योगांना जास्त दराने साखर विक्री केल्यास सामान्य ग्राहकांना झळ न बसताही कारखान्यांची वित्तीय स्थिती सुधारू शकते. 

‘‘साखरेचे दुहेरी दर धोरण ही संकल्पना ऐकायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि परीक्षण करताना मोठी जटीलता निर्माण होईल. व्यापाऱ्यांनी घरगुती वापराच्या दराने साखर खरेदी करून औद्योगिक दराने विकल्यास तेव्हा तुम्ही काय करणार,’’ असे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

काय आहे धोरण
साखरेच्या दुहेरी दर धोरणात घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर असतील. औद्योगिक वापरासाठीच्या साखरेचे दर जास्त असतील तर घरगुती वापरासाठीचे दर कमी असतील. या धोरणामुळे औद्योगिक क्षेत्रातून वाढणाऱ्या साखरेच्या मागणीमुळे संकटात सापडणाऱ्या साखर कारखान्यांना दिलासा मिळेल. 
 


इतर अॅग्रो विशेष
दुधासाठीचा हमीभाव आम्हाला लागू नाही;...पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त...
हापूसची १०५ टन निर्यातरत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी...
उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : राज्यात तापमानाचा पारा चाळीशीपार...
राज्यातील ‘पोल्ट्री’ला तेराशे कोटींचा... सांगली : कोरोना विषाणूची अफवा आणि...
एकी, प्रयोगशीलता, कष्टातून व्यावसायिक...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील सोगे संयुक्त...
 कांदा लिलाव पुन्हा खुल्या पद्धतीने;...नाशिक  : जिल्ह्यात ‘कोरोना’ची पार्श्वभूमी...
फळे, भाजीपाला निर्यातीसाठी पॅकिंग...मुंबई  : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे...
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...