सातपुड्यातील दाबमध्ये दवबिंदू गोठले

थंडीचा गहू, हरभऱ्याला लाभ होत आहे. परंतु, केळीला फटका बसत आहे. केळीची खालच्या भागातील पाने पिवळी दिसत आहेत. - ऋषीकेश महाजन, केळी उत्पादक, नायगाव (जि. जळगाव) थंडीसह जोरदार वाऱ्यांमुळे दादरचे पीक अनेक ठिकाणी आडवे झाले. दादर पिकात दाणे पक्व होण्याच्या प्रक्रियेला बाधा पोचेल. - नंदराम पटेल, शेतकरी, शहादा (जि. जळगाव) थंडी कायम असल्याने कांदा पिकाची अपेक्षित वाढ होत नसल्याची स्थिती आहे. कांदा रोपांचे वरचे शेंडे काहीसे पिवळे दिसत आहेत. - नरेंद्र पाटील, शेतकरी, कापडणे (जि. धुळे)
सातपुड्यातील दाबमध्ये दवबिंदू गोठले
सातपुड्यातील दाबमध्ये दवबिंदू गोठले

जळगाव : खानदेशात दोन दिवसांत किमान तापमान पुन्हा झपाट्याने कमी झाले आहे. हुडहुडी भरविणारी थंडी आल्याने केळीला फटका (चिलींग इंज्युरी) बसत असल्याची स्थिती आहे. त्याच वेळी थंड व वेगाचे वारेही वाहत असल्याने उंच वाढलेले दादरचे पीक अनेक ठिकाणी आडवे होत आहे. 

धुळ्यात शुक्रवारी (ता.८) मध्यरात्रीनंतर किमान तापमान २.५ अंश सेल्सिअस, जळगावात ६ अंशपर्यंत पोचले. दाबमधील किमान तापमानाची आकडेवारी मिळू शकली नाही. नंदुरबारमधील दाब (ता. अक्कलकुवा) येथील सातपुडा पर्वतरांगेतील काही भागात दवबिंदू गोठल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी दुपारपासून थंड वेगवान वारे वाहत होते. खानदेशात धुळे जिल्ह्यातील शिरपूर, धुळे, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव व नंदुरबारमधील शहादा तालुक्‍यात दादर (रब्बी ज्वारी) अधिक आहे. सर्वत्र निसवण झाली आहे. कणसे भरली आहेत. वेगवान वाऱ्यात कणसांचे वजन तोटे सहन करू शकत नसल्याने अनेक ठिकाणी पीक काहीअंशी आडवे झाले. हे नुकसान १० ते १५ टक्के असल्याची माहिती मिळाली.

नवीन लागवडीच्या चिलींग इंज्युरीचा फटका बसलेल्या केळी बागा तापमान काहीसे वाढल्याने सुधारत होत्या. मात्र त्यांना थंडीचा फटका बसला. अनेक ठिकाणी तीन ते चार महिन्यांच्या केळीची खालच्या भागातील पाने काळी - पिवळी पडल्याचे सांगण्यात आले. केळीमध्ये किमान तापमान अधिक घसरू नये, यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस बागेभोवती शेकोट्या केल्या.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, कुसुंबा, नेर भागात या महिन्यात लागवड झालेल्या कांदा पिकाच्या वाढीतही अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी कांदा रोपाचे वरचे शेंडे पिवळे पडल्यागत स्थिती झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गहू, हरभरा या पिकांना मात्र थंडीचा लाभ होत असल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com