'माझ्या पोराप्रमाणं तू पण शेतकऱ्याला धरून रहा'

'माझ्या पोराप्रमाणं तू पण शेतकऱ्याला धरून रहा'
'माझ्या पोराप्रमाणं तू पण शेतकऱ्याला धरून रहा'

कोल्हापूर : माझा आशीर्वाद लय मोठा हाय, ज्या प्रमाणे माझा पोरगा शेतकऱ्यांना धरून हाय, तसाच तू पण शेतकऱ्यांना धरून रहा असे म्हणत राजू शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई यांनी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांच्या गालावरून मायेने हात फिरविला. तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच चांगले होइल, असे सांगत श्री. माने यांनी त्यांना आश्‍वस्त केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून नूतन खासदार धैर्यशील माने समर्थक व शेट्टी समर्थकांत सोशल मीडियावरून जोरदार युद्ध सुरू होते. श्री. माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत बुधवारी (ता. १८) सकाळीच श्री. शेट्टी यांचे निवासस्थान गाठून शेट्टी यांच्या मातोश्रींपुढे नतमस्तक होत भविष्यातील वाटचालीसाठी आशीर्वाद मागितला, तर शेट्टींच्या मातोश्रींनीही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.  गेल्या दशकाहून अधिक काळ शेतकऱ्यांचा नेता म्हणून देशपातळीवर काम केलेल्या खासदार राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने या युवा उमेदवारांकडून धक्कादायक पराभव झाला. शेतकऱ्यांसाठी हा अनपेक्षित पराभव होता.  पराभवानंतर कार्यकर्त्याच्या आरोप-प्रत्यारोपाने वातावरण गढूळ झाले. त्यातच सोशल मीडियावरून चिथावणीची भाषा वापरली जात असल्याने तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. माने यांनी श्री. शेट्टी यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता. २९) सकाळी भेट दिली. त्यांचा सत्कार श्री शेट्‌टी यांनी केला. यानंतर माने यांनी शेट्टींच्या मातोश्रीं रत्नाबाई भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आता निवडणूक झाली आहे. यामुळे कशासाठी ईर्षा असा दृष्टिकोन ठेवून आपण श्री. शेट्टी यांच्या आईंचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे श्री. माने यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना तुमची ही मदत लागेल, असे श्री. माने यांनी शेट्टी यांना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com