कोल्हापुरातील धामणे धरणाला गळती

मधल्या काळात गळती रोखण्याची कामेही करण्यात आली. २०१४ पासून मात्र गळती रोखण्याचे काम निधीअभावी होऊ शकले नाही. धरण सुरक्षितता समितीच्या शिफारशीनुसार या धरणाच्या दुरुस्तीचा सात कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. गळती असली तरी तूर्तास या धरणाला धोका नाही. - रा .र .धाकतोडे,कार्यकारी अभियंता, तिलारी पाटबंधारे प्रकल्प
कोल्हापुरातील धामणे धरणाला गळती
कोल्हापुरातील धामणे धरणाला गळती

सिंधुदुर्ग : कोल्हापूर जिल्ह्यातील धामणे (ता. चंदगड) धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. या धरणास धोका निर्माण झाल्यास दोडामार्ग तालुका आणि उत्तर गोव्यातील अनेक गावांना त्याचा धोका आहे. तरीही प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाच्या आठवणी जाग्या असताना आता धामणे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात कर्नाटकच्या सीमेवर आहे. त्यातील पाण्याचा थेट संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका आणि उत्तर गोव्याशी येतो. या धरणाच्या पाण्यावरच तिलारी घाटाच्या पायथ्याशी वीजघर येथे वीजनिर्मिती प्रकल्प आहे. त्यानंतर हे पाणी कोदाळी धरणात सोडले जाते.

धरणाच्या तिन्ही दरवाजांच्या दोन्ही बाजूच्या दगडी भिंतीला अनेक ठिकाणी गळती आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या धरणाला धोका निर्माण झाल्याचा फटका दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे, सासोली, मणेरी, कोनाळ, कोनाळकट्टा, वायंगणतड, साटेली, आवाडे, वेळपई या गावांना बसला आहे.

धामणे धरण

  •  पाणीसाठा वर्ष -१९८४
  •  धरणांतील पाणीसाठा- ४ टीएमसी
  •  पाणीपातळी- ७५.२० मीटर
  •  यंदा धरणक्षेत्रात पाऊस -४८४८ मिमी
  •  दगडी बांधकामी धरण
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com