धामणगाव बाजार समिती संचालकांना गैरव्यवहारप्रकरणी अपात्रतेची नोटीस

नियमानुसार पहिल्या टप्प्यात कलम ४५ नुसार नोटीस, त्यानंतर प्रत्यक्ष सुनवाई व दस्तऐवज पडताळणी. पणन मंडळाकडे पुण्याला प्रस्तावित कारवाईचा अहवाल पाठविला जातो. त्यांच्या शिफारसीनंतर संचालक मंडळावर अपात्रतेची कारवाई होते. धामणगाव बाजार समितीमधील तारण घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. - संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती
शेतमाल
शेतमाल

अमरावती ः तारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन राज्यस्तरीय पुरस्कार पटकाविणाऱ्या धामणगाव बाजार समितीतच कोट्यवधी रुपयांचा तारण गैरव्यवहार उघड झाला आहे. याप्रकरणी सहकार विभागाने सभापतींसह २२ संचालकांना नोटीस बजावत १५ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.  धामणगाव बाजार समितीवर भाजपची सत्ता आहे. २०१७-१८ या वर्षातील विशेष अहवालाच्या आधारे सहकार विभागाने चौकशी केली. त्यात सभापती मोहन इंगळे यांच्यासह तत्कालीन सचिव भिवरकर, प्रभारी सचिव वानखडे, लेखापाल पांडे यांच्यावर सुमारे ३ कोटी ५ लाख २४ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याआधारे  सहकार विभागाकडून संचालक मंडळ बरखास्तीची शिफारस करण्यात आली. तारण न ठेवताच हितसंबंध जपत पैसा दिला गेला, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विशेष लेखा परीक्षणात हे गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आले आहेत. संचालक मंडळाने स्वतः व कुटुंबीयांच्या नावाने रक्‍कम उचलली परंतु त्यापोटी शेतमाल तारणच ठेवण्यात आला नाही.  दरम्यान कारवाईतील चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे कोट्यवधीची वसुली करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये सभापती मोहन इंगळेंकडून १ कोटी २ लाख ६९ हजार १२३ रुपये, तत्कालीन सचिव शंकर भिवरकर यांच्याकडून ७५५५५ रुपये, लेखापाल प्रेमदास पांडे यांच्याकडून १ कोटी १ लाख २७ हजार ५३५ रुपये तर प्रभारी सचिव प्रवीण वानखडे यांच्याकडून १ कोटी ६९ हजार ९८१ रुपये वसूलपात्र आहेत. यांच्यासह उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर, संचालक रामदास निस्ताने, दिलीप लांबाडे, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर ढोले, विजय गुल्हाने, बबन मांडवगणे, स्नेहल जायले, प्रीती हांडे, श्रीकांत गावंडे, प्रशांत सबाने, मनोज कडू, निरंजन देशमुख, नवीन टेकाळे, रमेश राठी, सत्यनारायण लोया, विशाल पोळ, पंढरीनाथ बेसेकर, रोशन कंगाले, विनोद धुर्वे, अनिल राठी, अशोक कांकरिया यांनादेखील नोटीस बजाविण्यात आली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com