धामणेरच्या शालिनी पवार यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद 

धामणेरच्या शालिनी पवार यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद 
धामणेरच्या शालिनी पवार यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद 

सातारा : पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी पन्नास हजार मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले. उज्ज्वला योजनेतून गॅस मिळाला अन् स्वच्छतागृहासाठी अनुदान मिळाले, त्यामुळे आम्हाला धामणेर (जि. सातारा) येथे कायमचे आमच्या हक्काचे घर मिळाले. अन आयुष्य स्थिर झाले, अशी भावना कातकरी समाजाच्या शालिनी पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध घरकुल योजनांतील लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्या वेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स रूममधून धामणेर, ता. कोरेगावच्या शालिनी शांताराम पवार, खोजेवाडी ता. साताऱ्याच्या बानूबी बादशाह मुलानी आणि शांताबाई कृष्णात मदने यांनी संवाद साधला. 

या वेळी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण, शहरी), रमाई आवास योजना, शबरी आदिवासी आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील लाभार्थी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपस्थित होते. 

खोजेगावाच्या बानूबी बादशाह मुलानी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना म्हणाल्या, घरात मी आणि माझा मुलगा दोघेच होतो. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे घर बांधणे शक्य नव्हते, प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मी आज शौचालय, गैस असलेल्या पक्क्या घरात राहत आहे. माझा मुलगा शिकत असून, या घरामुळे आम्ही दोघही खूप समाधानी आहोत. शांताबाई कृष्णात मदने यांनी आपण पूर्वी कच्च्या घरात राहत होतो. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पक्के घर मिळाले. आता मी माझे पती आणि दोन मुले अतिशय आनंदानी या घरात राहत असून, या घरासाठी दीड लाख अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले.

राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १२ लाख घरांचे २०१९ च्या अखेरपर्यंत नियोजन असून, आत्तापर्यंत ६ लाख घरे बांधली आहेत. उर्वरित ६ लाख घरे या वर्षात पूर्ण होतील. घरकुल योजनेतील घरे बांधताना मुख्यतः वाळूची समस्या भेडसावत होती. आता आम्ही ५ ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न घेता देणार आहोत. त्यामुळे हा प्रश्न सुटेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com