agriculture news in marathi, dhanajay munde speech about artificial rain, jalna, maharashtra | Agrowon

कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने मराठवाड्याला फसविले ः धनंजय मुंडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य पूरस्थितीमुळे तर मराठवाडा दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. मात्र, जनतेची मदत करण्याची दानत या सरकारमध्ये दिसली नाही. या सरकारला जमते ती फक्त फसवेगिरी. ऑगस्ट महिना उलटूनही आज मराठवाड्यात पाऊस नाही. सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा शब्द दिला. ढग आले पण सरकारची पाऊस पाडणारी विमाने आलीच नाहीत, सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य पूरस्थितीमुळे तर मराठवाडा दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. मात्र, जनतेची मदत करण्याची दानत या सरकारमध्ये दिसली नाही. या सरकारला जमते ती फक्त फसवेगिरी. ऑगस्ट महिना उलटूनही आज मराठवाड्यात पाऊस नाही. सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा शब्द दिला. ढग आले पण सरकारची पाऊस पाडणारी विमाने आलीच नाहीत, सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा पैठण येथून सुरू झाल्यानंतर बदनापूर व भोकरदन येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, कदिरजी मौलाना, डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक बांधू असे आश्वासन देत, पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजनही केले. मात्र अजून स्मारकाचा पत्ता नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य स्मारक उभेही राहिले. त्याबाबत आमचे दुमत नाही पण शिवस्मारक अद्याप का झाले नाही असा सवाल श्री. मुंडे यांनी केला. 

भाजप सरकार नीच राजकारण करत आहेत. मधुकर पिचड यांच्या पत्नीवर जमीन लाटल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांच्यावर साधी एफआयआर दाखल केली नाही आणि थेट भाजपमध्ये प्रवेश दिला. पारदर्शकतेचा बिगुल वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सांगावे की या असभ्य राजकारणाचे धडे कुठे घेतले असा सवाल श्री. मुंडे यांनी उपस्थित केला.


इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...