कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांच्या प्रश्नी धनंजय मुंडे यांचे परळीत ठिय्या आंदोलन सुरू
परळी, जि. बीड ः परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या विम्यातून वगळल्याबाबत तसेच संपूर्ण पिकांचा पीकविमा द्यावा, वैद्यनाथ कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे पैसे द्यावेत, दुबार पेरणीसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. ७) परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हजारो शेतकऱ्यांसह भरपावसात ठिय्या आंदोलनास बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता शहराच्या मार्केट कमिटी येथून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
या वेळी श्री. मुंडे म्हणाले, की पीकविमा हा शेतकऱ्यांचा हक्काचा असताना बीड जिल्ह्यातील दोनच तालुक्यांना कसे वगळले? मंत्र्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. वैद्यनाथ कारखान्याने उसात आणि नंतर बिलात जाणीवपूर्वक राजकारण केले. पक्ष पाहून शेतकऱ्यांचे पैसे रोखले. मोजक्याच शेतकऱ्यांना १४०० रुपयांप्रमाणे बिल देऊन निवडणूक जिंकली. मात्र नंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. एफआरपीप्रमाणे पैसे न देणाऱ्या कारखान्याच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दुष्काळ असताना कृत्रिम पावसाच्या घोषणा झाल्या, कुठे गेली ती विमाने असा सवाल त्यांनी केला. सत्ता आल्यावर एक महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन त्यांनी दिले.
- 1 of 584
- ››