‘रिलायन्स’चे दूध आल्यावरच दुधाचे दर वाढविणार का? ः धनंजय मुंडे

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर  ः दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्स किंवा पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १७) नियम ९७ अन्वये उपस्थित आपत्कालीन चर्चेत ते बोलत होते. देशातील पहिला शेतकरी संप राज्यात झाला. मार्च महिन्यात मुंबईतील विधान भवनावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला. आता शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतावे लागत आहे. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय दयायचाच नाही, असे सरकारने धोरण ठरविले आहे काय, असा सवाल श्री. मुंडे यांनी उपस्थित केला.

सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रुपये दर जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांना केवळ १७ रुपये भाव मिळत आहे. आंदोलन केल्यानंतरही सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबत आहे. केवळ घोषणांमुळे दूध उत्पादकांचे पोट भरणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दुग्धविकासमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात या वक्‍तव्याचा समाचार घेताना नागपूरच्या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख, वेदना समजत नाहीत. दुधातले पाणी कसे दिसते, असा प्रश्‍न उपस्थित केला.

दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांना एका दूध उत्पादक शेतकऱ्याने फोन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या ५५ वर्षांच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचा, चौकशी करण्याच्या कृतीचाही त्यांनी समाचार घेताना शेतकऱ्यांनी तुम्हाला जाबही विचाराचा नाही का, असा प्रश्‍न केला. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये थेट अनुदान द्या, दूध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करा, हे अनुदान दोन महिन्यांसाठी नव्हे तर सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com