agriculture news in marathi, dhananjay munde bleming on narendra modi, mumbai, maharashtra | Agrowon

मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही ः धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे ही तुमची शिकवण असेल, तर मोदीजी हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे ही तुमची शिकवण असेल, तर मोदीजी हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेले महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले आहे. ‘जगात गेल्या पाच हजार वर्षांपासून ज्या महान संस्कृती आणि परंपरेने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संदेश दिला. ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हा संदेश दिला. ज्या संस्कृतीने ‘एकम् सद् विप्रा: बहुधा वदन्ति’चा संदेश दिला. त्या संस्कृतीला तुम्ही (काँग्रेस नेते) दहशतवाद ठरवून मोकळे झालात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतीक असून काँग्रेसला हे आरोप महागात पडणार आहेत’, असे मोदी यांनी म्हटले होते.

हेमंत करकरे हे माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे धक्कादायक विधान मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका सभेत केले आणि वाद निर्माण झाला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत मोदींना लक्ष्य केले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...