agriculture news in marathi, dhananjay munde demands to give crop insurance, mumbai, maharashtra | Agrowon

सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम तातडीने द्या ः धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

येत्या सात दिवसांत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वाटप करा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा नुकसानभरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे बारा लाख शेतकरी पीकविमा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळी मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असून, पात्र विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाईची रक्कम वाटप करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांना पत्र पाठवून मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

खरीप २०१८ मधील हंगामासाठी बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम भरणा केलेली आहे. सोयाबीनव्यतिरिक्त इतर पिकांचा विमा बँकेकडे वर्ग झालेला आहे. मात्र, शासनाच्या हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. बीड जिल्ह्यात सुमारे बारा लाख शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी विमा हप्ता भरला होता. या पात्र विमाधारक शेतकऱ्यांना सुमारे ८०० ते ९०० कोटी रुपये पीक नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाया गेलेली असतानाही शासन आणि संबंधित विभागाचे मंत्री यासंदर्भात बोलत नाहीत. पीकविमा कंपन्यांकडून सातत्याने नफेखोरी केली जात असल्याची टीकाही श्री. मुंडे यांनी केली आहे.

पेरणीपूर्वी उन्हाळी मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही, शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत आवश्यकता आहे. शासनाने केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत किमान ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला आहे; अशा पात्र शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाईची रक्कम वेळेत मिळाली पाहिजे, अशी मागणी श्री. मुंडे यांनी केली आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...