agriculture news in marathi, dhananjay munde react on farmers issue, mumbai, maharashtra | Agrowon

सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या'' अशी व्यथा व्यक्त करणाऱ्या हिंगोली येथील शेतकरी नामदेव पतंगे यांचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये विधान परिषदेत मांडला. मात्र, धनंजय मुंडे यांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली; त्यावर या सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही, असे म्हणत श्री. मुंडे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. 

मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या'' अशी व्यथा व्यक्त करणाऱ्या हिंगोली येथील शेतकरी नामदेव पतंगे यांचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये विधान परिषदेत मांडला. मात्र, धनंजय मुंडे यांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली; त्यावर या सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही, असे म्हणत श्री. मुंडे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. 

गेल्या तीन वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ आहे. या तीन वर्षांत शेतकरी पूर्ण होरपळून निघाला आहे. दुष्काळाला कंटाळून शेणगाव तालुक्यातील नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासत असल्याने ''किडनी घ्या; पण बियाणे द्या'' अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि सभागृहात यावर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते श्री. मुंडे यांनी केली. मात्र, मागणी फेटाळण्यात आली. शेतकऱ्यांना पूर्वमशागतीसाठी पेरणीसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी सातत्याने लावून धरली आहे.

दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या वर्षी आरक्षणानुसार प्रवेश मिळावा, याकरिता राज्य सरकारने न्यायालयात ताकदीने बाजू मांडली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक निकाल अपेक्षित आहे, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत व्यक्त केला.

प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे यंदा वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला होता; या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडली. आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, सरकारने विद्यार्थी आणि पालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी आणि प्रामाणिक भूमिकेतून प्रयत्न केले, असे सांगत ही प्रवेश प्रक्रिया सुलभ झाल्याचे श्री. महाजन यांनी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी सरकार केंद्र सरकारशी चर्चा करीत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...