मेंढ्यासह धनकर समाज रस्त्यावर, ममदापूर पाटीवर केला रास्तारोको

मेंढ्यासह धनकर समाज रस्त्यावर, ममदापूर पाटीवर केला रास्तारोको
मेंढ्यासह धनकर समाज रस्त्यावर, ममदापूर पाटीवर केला रास्तारोको

लातूर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ममदापूर पाटीवर (ता. लातूर) येथे रविवारी (ता.१२) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी समाजाची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज शासनाकडे मागणी करीत आहे. पण त्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासने देवूनही सत्ताधाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या समाजात असंतोष पसरला आहे.  रविवारी (ता. १२) दुपारी ममदापूर पाटीजवळ (ता. लातूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मेंढ्या घेवून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. अर्धातास हा रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ३७ कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. दरम्यान महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, महिला संघटना, कर्मचारी संघटनेच्या वतीने ता. १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर, धनगड एकच जमातीसाठी वापरलेला शब्द आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा वापरून राज्यता धनगर जमाती आदिवासी जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर धनगड, धनगर शब्द हा धनगरासाठी वापरला आहे. राज्यात एकही धनगड जमातीचे नाहीत. तर कोणी असेल तर शासनाने गावनिहाय त्याची यादी द्यावी. पण यात शासन दिशाभूल करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com