agriculture news in marathi, Dhangar Reservation issue in Assembly session | Agrowon

धनगर आरक्षणावरून गदारोळ
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

मुंबई : सत्ताधारी पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली केवळ गाजर दाखवीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. धनगर आरक्षणावर पाच वर्षे सरकारला काहीही करता आले नसल्याने सरकारला त्यावर उत्तरही द्यायचे नसल्याने सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ सुरू केला आहे का, असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (ता.२७) आरोप केला.

मुंबई : सत्ताधारी पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली केवळ गाजर दाखवीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. धनगर आरक्षणावर पाच वर्षे सरकारला काहीही करता आले नसल्याने सरकारला त्यावर उत्तरही द्यायचे नसल्याने सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ सुरू केला आहे का, असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (ता.२७) आरोप केला.

धनगर समाजाच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र मिळून केलेल्या गोंधळात विधान परिषदेचे कामकाज अनेकदा बंद पडले. धनगरांबरोबर मराठा आरक्षणावरून घोषणांचा कलगीतुरा रंगला होता. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला; त्याला सत्ताधारी पक्षाकडून, १४ मराठा मुख्यमंत्री झाले. पण, मराठा समाजास आरक्षण फडणवीस सरकारनेच दिले, अशा शब्दात विरोधकांना उत्तर देण्यात आले. 

या चर्चेत भाग घेताना धनंजय मुंडे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारला काही निर्णय करता आले नाही. सरकारने उत्तरही देऊ नये, यासाठी हा गोंधळ सुरू आहे का? .

सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब
काँग्रेसचे आ. भाई जगताप यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्यावरून सभागृहात कामकाज पाच वेळा घोषणाबाजी करून बंद पाडले. तालिका सभापती हुस्नबानो खलिफे यांनी धनगर आरक्षणावर चर्चा व्हावी, यासाठी कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. भाई जगताप यांचे वक्‍तव्य तपासून कामकाजातून काढून टाकण्याविषयी सभागृहाला आश्‍वस्त केले. मात्र, जगताप यांनी सभागृहाची माफी मागावी, यावर सत्ताधारी कायम राहिल्याने परिषदेचे सभागृह दोनदा दहा मिनिटांसाठी, एक तासासाठी एकदा आणि दोन वेळा अर्ध्या तासासाठी बंद पाडले.
 

इतर ताज्या घडामोडी
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...