Agriculture news in Marathi, Dhangarwada worried over death of animals | Agrowon

जनावरांच्या मृत्यूने धनगरवाडा चिंतेत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

ढेबेवाडी, जि. सातारा : धनगरवाडा (कसणी, ता. पाटण) येथील अनेक शेतकऱ्यांची जनावरे अचानक दगावल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हा कोणत्याही साथीचा प्रकार नसून, विषबाधेतून ही घटना घडल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. 

ढेबेवाडी, जि. सातारा : धनगरवाडा (कसणी, ता. पाटण) येथील अनेक शेतकऱ्यांची जनावरे अचानक दगावल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हा कोणत्याही साथीचा प्रकार नसून, विषबाधेतून ही घटना घडल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. 

दुर्गम डोंगरातील कसणी गावापासून सुमारे तीन किलो मीटरवर सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत धनगरवाडा वसला असून, पशुपालन हाच तेथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. धनगरवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच-सहा जनावरे असून, त्यामध्ये गायी, म्हशी व वासरांचा समावेश आहे. गावापासून जवळच असलेल्या सांगली जिल्ह्याच्या हद्दीतील खोंदलापूरच्या धनगर वाड्यातील डेअरीत तेथील शेतकरी दूध घालतात. गावलगतच्या शिवारात सकाळी लवकर जनावरे चरायला सोडल्यावर सायंकाळी ती घरी येतात. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून काही शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याने तेथे घबराटीचे वातावरण आहे. 

सरपंच मिनल मस्कर व माजी सरपंच मारुती मस्कर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार बजरंग बापू अनुसे, सीताराम विठ्ठल जानकर, धोंडीबा ठकू बोडेकर, धोंडीबा भागोजी शेळके, धाकलू जोती बोडेकर या शेतकऱ्यांची सुमारे १७ जनावरे दगावली असून, त्यामध्ये दहा गायी, दोन म्हशी व पाच वासरांचा समावेश आहे. काही जनावरे घरात तर काही शेतातच मृत्यूमुखी पडली आहेत. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश पाटील व त्यांचे सहकारी श्री. कुष्ठे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या वेळी श्री. पाटील म्हणाले, ‘‘हा बॉटूलिझम आजाराचा प्रकार दिसत नाही. विषारी चारा किंवा अन्य विषबाधेमुळे जनावरे दगावल्याचा अंदाज आहे. ग्रामस्थ १७ जनावरे दगावल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात तीनच जनावरांबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. यापूर्वी आणि आताही तेथे लसीकरण करण्यात आलेले आहे.’’

दरम्यान, अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या धनगरवाड्यातील शेतजमिनीचा प्रश्न अद्याप न सुटल्याने शेतकऱ्यांच्या नावावर ते कसत असलेल्या जमिनीचा सात- बारा झालेला नाही. परिणामी, वन्यप्राणी तसेच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईपासूनही त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

पशुपालन हाच धनगरवाड्यातील उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असून, जनावरे नेमकी कशामुळे दगावत आहेत, याची तपासणी करून आवश्‍यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात यायला पाहिजे. तरच हे थांबणार आहे.
-मिनल मस्कर, सरपंच, कसणी


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...