agriculture news in Marathi, Dharma-Raja's water Ended | Agrowon

धर्मराजाचा कडाही यंदा आटला
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

माजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला धर्मराजाचा कडा यंदा आटल्याने परिसरातील विहीर, विंधन विहिरीची पाणीपातळी कमालीची घटली असल्याने या भागातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. १९७२ नंतर पहिल्यांदाच या कड्यातील पाणी आटल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. 

माजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला धर्मराजाचा कडा यंदा आटल्याने परिसरातील विहीर, विंधन विहिरीची पाणीपातळी कमालीची घटली असल्याने या भागातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. १९७२ नंतर पहिल्यांदाच या कड्यातील पाणी आटल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. 

यावर्षी कमी पावसामुळे खरीप, रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला. धरणालगतच धर्मराजाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे धर्मराजाचा कडा आहे. या कड्यात बाराही महिने मुबलक पाणीसाठा असतो. यामुळे या कड्यालगत असणारी देवखेडा, नांदूर, पुनंदगाव, नागझरी या गावांत असणाऱ्या विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळी कमी होत नव्हती; परंतु हा कडा आटल्याने परिसरातील पाणीस्रोत बंद झाला आहे. 

या भागातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे, तर १९७२ ला निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत देखिल या कड्याला मुबलक पाणी होते. अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु, पिण्यासाठी या कड्यात पाणी उपलब्ध होते. निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे हा कडा देखिल आटला असल्याने परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.

परिसरातील ग्रामस्थांची धर्मराज मंदिरातील धर्मनाथावर मोठी भक्ती आहे. या कड्यातील पाणी या श्रद्धेमुळे कधीच आटत नव्हते; परंतु या वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कड्यातील पाणी, तर आटलेच आहे; परंतु परिसरातील पाणी स्रोतही आटला आहे. 
- बाळूराम मायकर, देवखेडा.

धर्मराजाच्या कड्यात असलेल्या पाण्यामुळे या भागातील जनावरांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याकरिता पाणी उपलब्ध होत असे; परंतु या कड्यातील पाणीसाठा आटल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. 
-रामेश्वर साखरे, माजलगाव.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...