Agriculture news in marathi In Dhule District Bank The three were unopposed | Agrowon

धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोध

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

धुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्यात येथील निवडणूक कार्यालयात गुरुवारी (ता. २१) झालेल्या छाननीअंती दाखल एकूण ११२ उमेदवारी अर्जांपैकी सात अर्ज अवैध, तर १०५ अर्ज वैध ठरले आहेत.

धुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्यात येथील निवडणूक कार्यालयात गुरुवारी (ता. २१) झालेल्या छाननीअंती दाखल एकूण ११२ उमेदवारी अर्जांपैकी सात अर्ज अवैध, तर १०५ अर्ज वैध ठरले आहेत. या प्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून अनुमोदक महिलेची खोटी स्वाक्षरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिरपूर येथील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार प्रभाकर चव्हाण बिनविरोध निवडून आले आहेत. 

निवडणुकीत माघारीच्या ८ नोव्हेंबरच्या प्रक्रियेपूर्वीच आतापर्यंत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलचे दीपक पाटील (शहादा), भरत माळी (तळोदा) आणि प्रभाकर चव्हाण (शिरपूर), असे तीन, तर शिवसेनेचे आमश्‍या पाडवी (अक्कलकुवा), असे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याबाबत अधिकृत घोषणा माघारीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर होईल. त्यामुळे एकूण १७ पैकी उर्वरित १३ जागांसाठी ही निवडणूक होईल. यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली आहे.

त्यांच्याविरोधात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल लढत देईल. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख आमदार अमरिशभाई पटेल प्रयत्नशील आहेत. हे पॅनेल शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते की नाही, या बाबत उत्सुकता आहे. 

जिल्हा बँकेच्या येथील मुख्य कार्यालयात निवडणूक यंत्रणेचे कार्यालय आहे. तेथे गुरुवारी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी झाली. तीत शिरपूर तालुका विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून इच्छुक राजधर पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाला. त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी एकमेव उमेदवार माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज छाननीवेळी इच्छुक राजधर पाटील यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी असलेली महिला उपस्थित झाली. तिने अर्जावर माझी स्वाक्षरी, आधारकार्ड नाही, असे सांगितले. 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...