सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्हा राज्यात प्रथम

सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्ह्याने लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्याने नाशिक विभागातच नव्हे, तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
Dhule district first in the state in computerization
Dhule district first in the state in computerization

धुळे : सातबारा संगणकीकरणात धुळे जिल्ह्याने लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्याने नाशिक विभागातच नव्हे, तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. मार्च २०२१ अखेर दोन लाख ७० हजार ६९५ सातबारा संगणकीकरणाचे काम जिल्हाधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा ई- फेरफार प्रकल्पाच्या नोडल अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली.

सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रमाने जिल्ह्यातील ई- फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफारबाबत प्रलंबितता कमी करून नागरिकांना दिलासा देणारे कामकाज केले आहे. महसूल विभागाच्या ई- फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सुलभ व्हावे, म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ विकसित केले असून, याआधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क आणि नि:शुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी सांगितले.

आगामी काळातही जिल्ह्याचा प्रथम क्रमांक कायम राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण केली जातील. महसूल विभागाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यादव, अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांनी समाधान व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com