agriculture news in marathi, Dhule district water storage at alert range | Agrowon

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती बिकट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

धुळे: जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट बनली आहे. यामुळे सिंचनासाठी पाणी पुरेसे नसल्याचे चित्र आहे. शिंदखेडा व साक्री तालुक्‍यातील लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. 

धुळे: जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट बनली आहे. यामुळे सिंचनासाठी पाणी पुरेसे नसल्याचे चित्र आहे. शिंदखेडा व साक्री तालुक्‍यातील लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. 

जिल्ह्यात फक्त पांझरा प्रकल्पाची स्थिती बरी असून, विविध भागातील पाझर तलाव, मध्यम प्रकल्पांमध्ये फारसा जलसाठा नाही. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण १६ टक्के जलसाठा आहे. पावसाळ्यातच बुराई व इतर प्रकल्प भरले नव्हते. पांझरा प्रकल्पात परतीच्या पावसामुळे जलसाठा झाला. परंतु या प्रकल्पातून अनेक गावे व शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पांझरा नदीकाठावरील गावांमध्येही पाणीटंचाई आहे. तापी नदीचा लाभ शिंदखेडा व शिरपूर तालुक्‍यातील काठच्या गावांना मिळतो. सुलवाडे व सारंगखेडा बॅरेज तापी नदीवर आहे. परंतु त्यातून पाणी उचलून ते शेतापर्यंत पोचविण्याची योजना नाही. 

तसेच विविध नद्या, नाल्यांवरील साठवण बंधारे, कोल्हापूर बंधारेही कोरडेठाक पडले आहेत. यामुळे शेतशिवारात पाणी नाही. परिणामी पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होणार आहे. शिरपूर, शिंदखेडा भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यात शिंदखेडामधील धुळे व साक्रीनजीकच्या भागात पाण्याची समस्या आहे. ही समस्या भीषण होत असल्याने पांझरा व इतर नद्यांवरील प्रकल्पांमधून नदीत पाणी सोडले जावे, अशी मागणी केली जात आहे. यामुळे नदीमध्ये पाणी पाझरून विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढेल व शेतशिवारात किमान कापूस लागवडीपुरते व पिण्यासाठीही पाणी मिळेल. टॅंकरची संख्या वाढतच आहे. आजघडीला १९ टॅंकर सुरू आहेत. तर टंचाईग्रस्त गावे जवळपास ४३ आहेत. येत्या पंधरवड्यात टंचाई आणखी बिकट होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...