नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे महाविकास आघाडी निष्प्रभ
धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला.
धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला.
निवडणुकीत महाविकास आघाडीची सरासरी दिडशे मते फुटली. त्यामुळे या निवडणुकीने आघाडीतील नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. निकालाने पटेल यांच्यापुढे महाविकास आघाडी निष्प्रभ ठरल्याचे चित्र समोर आले.
विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची पोटनिवडणूक एक डिसेंबरला झाली. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरुवारी (ता. ३) सकाळी आठपासून मतमोजणीस सुरवात झाली. त्यात भाजपचे उमेदवार पटेल यांना ३३२, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. चार मते बाद झाली.
धुळे- नंदुरबार मतदारसंघात भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, असे मिळून महाविकास आघाडीचे २१३, एमआयएमचे ९, समाजवादी पार्टीचे ४, बसप १, मनसे १, अपक्ष १० मतदार आहेत. महाविकास आघाडी कागदावर संख्याबळाने स्ट्रॉंग दिसत असली, तरी त्याचा निकालावर प्रभाव दिसला नाही. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे भगदाड पाडले.
महाविकास आघाडीत समन्वय नव्हता
महाविकास आघाडीच्या पाठीशी धुळे - नंदुरबार मतदारसंघातील केवळ ९८ सदस्य असल्याचे या निवडणुकीतून अधोरेखित झाले. काँग्रेसचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी, शिवसेनेचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात समन्वय दिसून आला नाही.
- 1 of 1028
- ››