कर्जमुक्ती  योजनेच्या अपलोडिंगमध्ये धुळे - नंदुरबार जिल्हा बॅंक राज्यात प्रथम 

कर्जमुक्ती  योजनेच्या अपलोडिंगमध्ये धुळे - नंदुरबार जिल्हा बॅंक राज्यात प्रथम 
कर्जमुक्ती  योजनेच्या अपलोडिंगमध्ये धुळे - नंदुरबार जिल्हा बॅंक राज्यात प्रथम 

धुळे  ः महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत फाइल अपलोडिंगमध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत शेतकऱ्यांकडील एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत कर्ज व अल्प मुदतीच्या पीककर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठण कर्जाची रक्कम दोन लाखांपर्यंत आहे. त्यात मुद्दल, व्याजासह थकीत व परतफेड न झालेल्या कर्ज रकमेचा समावेश आहे. अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या खात्यात दोन लाखांपर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाकडून झाला. त्याप्रमाणे एक ते २८ कॉलममधील माहिती संस्थांकडून मागवून विहित नमुन्यात संगणकावर भरण्यात आली आहे, हे काम सतत एक महिन्यापासून सुरू होते.  शासनाचे पोर्टल १ फेब्रुवारीला ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांत ११ वाजून ४० मिनिटांनी कर्जमुक्ती फाईल शासन पोर्टलवर अचूकरीत्या यशस्वी अपलोड झाली आहे. यात २८ हजार ५८१ पात्र सभासदांपैकी २७ हजार ५९८ सभासदांच्या (९७ टक्‍के) फाईल यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आल्या आहेत. फाईल अपलोडिंगमध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. पात्र सभासदांच्या याद्या बॅंकेस प्राप्त झाल्यानंतर सभासदांनी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अंगठ्याचा ठसा बॅंकेच्या शाखेत देऊन प्रमाणीकरण करावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक विजय सावंत यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com