मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने शेतकऱ्यांची दैना 

मानोरा (जि. वाशीम)शनिवारी (ता. १६) झालेल्या पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दैना उडाली. घरी वाळू घातलेले धान्य, कडधान्यही भिजले. शेतातील लावलेल्या सोयाबीनच्या गंज्याही भिजल्या आहेत.
 मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने शेतकऱ्यांची दैना  Dhuvadhar in Manora taluka The plight of farmers due to rains
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने शेतकऱ्यांची दैना  Dhuvadhar in Manora taluka The plight of farmers due to rains

मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दैना उडाली. घरी वाळू घातलेले धान्य, कडधान्यही भिजले. शेतातील लावलेल्या सोयाबीनच्या गंज्याही भिजल्या आहेत.  मानोरा तालुक्यात शनिवारी (ता. १६) पहाटे एकाएकी पावसाने हजेरी लावली. अनेकांनी ओलसर सोयाबीन वाळू घातले होते तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात सोंगून होते. एकाच वेळी दोन ठिकाणी पोहोचायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला. डोळ्यांदेखत बारा महिन्यांचे नियोजन पाण्यात गेले.  तालुक्यातील सोयजना येथील महिला मंगला धनराज चव्हाण यांच्या शेतात सोयाबीन सोंगून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्याची उचल करायची होती. परंतु पहाटे पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण सोयाबीन भिजले. रात्री अति धुवाधार पाऊस झाल्याने संपूर्ण सोयाबीनच्या शेंगा जागेवर गळून गेल्या. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

५० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच  सोयाबीन हंगामाला १५ दिवस आधीच काढणीला सुरुवात झाली असली, तरी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल अद्यापही शेतातच पडून आहे. त्यातच पांदण रस्त्याचा ही प्रश्‍न ऐरणीवर आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com