Agriculture News in Marathi Dhuvadhar in Manora taluka The plight of farmers due to rains | Page 2 ||| Agrowon

मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने शेतकऱ्यांची दैना 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

मानोरा ( जि. वाशीम)  शनिवारी (ता. १६) झालेल्या पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दैना उडाली. घरी वाळू घातलेले धान्य, कडधान्यही भिजले. शेतातील लावलेल्या सोयाबीनच्या गंज्याही भिजल्या आहेत. 

मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दैना उडाली. घरी वाळू घातलेले धान्य, कडधान्यही भिजले. शेतातील लावलेल्या सोयाबीनच्या गंज्याही भिजल्या आहेत. 

मानोरा तालुक्यात शनिवारी (ता. १६) पहाटे एकाएकी पावसाने हजेरी लावली. अनेकांनी ओलसर सोयाबीन वाळू घातले होते तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात सोंगून होते. एकाच वेळी दोन ठिकाणी पोहोचायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला. डोळ्यांदेखत बारा महिन्यांचे नियोजन पाण्यात गेले. 

तालुक्यातील सोयजना येथील महिला मंगला धनराज चव्हाण यांच्या शेतात सोयाबीन सोंगून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्याची उचल करायची होती. परंतु पहाटे पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण सोयाबीन भिजले. रात्री अति धुवाधार पाऊस झाल्याने संपूर्ण सोयाबीनच्या शेंगा जागेवर गळून गेल्या. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

५० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच 
सोयाबीन हंगामाला १५ दिवस आधीच काढणीला सुरुवात झाली असली, तरी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल अद्यापही शेतातच पडून आहे. त्यातच पांदण रस्त्याचा ही प्रश्‍न ऐरणीवर आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.  


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...