भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
कृषिपूरक
शेळ्यांमध्ये रोग निदानात्मक चाचणी, नोंदी महत्त्वाच्या
रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. याकरिता वेळोवेळी रोग निदानात्मक चाचण्या पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे आवश्यक आहे.
रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. याकरिता वेळोवेळी रोग निदानात्मक चाचण्या पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे आवश्यक आहे.
जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये शेळ्यांच्या करडांचा वजन वाढीचा वेग जास्त असतो. या काळामध्ये करडे फक्त दुधावर जोपासली जातात. परंतु शेळ्यांना दूध कमी असल्यास किंवा एकापेक्षा जास्त पिल्ले असल्यास पिल्लांना दूध कमी मिळते. त्यामुळे पिल्लांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. पिल्लांचे वजन योग्य प्रमाणात मिळत नाही.याकरिता करडांच्या दुधामध्ये मिल्क रीप्लेसरचा वापर केल्यास पिलांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होऊन पिल्ले आजारी पडण्याचे व मरतुकीचे प्रमाण कमी करू शकतो.
जंत प्रतिबंध
जंत प्रादुर्भावामुळे शेळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन उत्पन्नामध्ये घट होत असते. याकरिता जंत प्रतिबंधक औषधोपचार शेळीपालक करतात, परंतु ऋतुनुसार विशिष्ट जंत प्रादुर्भाव होत असतो. त्यानुसार त्यावर प्रभावी असे जंतप्रतिबंधक औषध वापरणे आवश्यक आहे. तसेच जंतप्रादुर्भावाची तीव्रता चाचणी (EPG Test) करून जंतप्रतिबंधक औषधोपचाराच्या आवश्यकतेनुसार व जंताच्या प्रकारानुसार जंतनाशक औषध पाजणे कधीही फायदेशीर
ठरते.
लसीकरण
वार्षिक वेळापत्रकानुसार देवी, आंत्रविषार, घटसर्प, पीपीआर, लाळ्या-खुरकूत, नीलजिव्हा, धनुर्वात या रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वेळापत्रकानुसार करावे. लसीची शीतसाखळी खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.
रोग निदानात्मक चाचण्या
- आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेळीपालन व्यवसायाची संकल्पना दिवसेंदिवस शेळीपालकाकडून आत्मसात करण्याबाबतचा सकारात्मक प्रतिसाद वाढत आहे. परंतु यामध्ये रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. याकरिता वेळोवेळी रोग निदानात्मक चाचण्या पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे आवश्यक आहे.
- प्रामुख्याने सांसर्गिक गर्भपात, जोन्स डीसिज, कोक्सीडीओसिस, लेंडी नमुने तपासणी इ. चाचण्या करून त्यानुसार रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास याचा निश्चितच फायदा शेळी पालकांना होऊ शकतो.
संपर्क - डॉ. सचिन टेकाडे, ८८८८८९०२७०
(सहायक संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)
- 1 of 35
- ››