agriculture news in Marathi diesel delivery of diesel in remote areas Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागात शेतकऱ्यांना घरपोच डिझेल 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

जिल्ह्याच्या दुर्गम भागात शेतकऱ्यांना इंधनासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सवेतून मिळणाऱ्या इंधनासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही. कोरोना टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याच्या सर्व दुर्गम भागात ही सेवा राबविण्यात येईल. 
- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. 

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वाहने, यंत्रांसाठी घरपोच डिझेल पुरविण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि खेड तालुक्यासह जिल्ह्याच्या दुर्गम भागात ही सेवा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

दरम्यान, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना इंधनासाठी येणाऱ्या अडचणींना ‘अॅग्रोवन’ने वाचा फोडली होती. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात शेतीसाठी इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यासाठी वाहन पंपावर घेऊन जावे लागत होते. दुर्गम भागात हे पंप दूर अंतरावर असल्याने इंधनासाठी अधिक वेळ लागत होता. त्यासाठी इंधनाचा अपव्यय होत होता. परिणामी दुर्गम भागात शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या पार्श्र्वभुमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी क्षेत्रात डिझेल वाहतूक वाहनांद्वारे घरोघरी जाऊन डिझेल वितरणाची परवानगी दिली. रेपॉस एनर्जी या संस्थेमार्फत जिल्ह्यातील दुर्गम भागात या सेवेला सुरवात करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर केंद्रे यांच्या उपस्थितीत भोर आणि वेल्हा तालुक्यात या डिझेल वितरण सेवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, रेपोस एनर्जीचे राजेंद्र वाळुंज व पूजा वाळुंज, निगुडघरच्या सरपंच बायदाबाई किसान कंक, वाठरचे संदीप खटापे उपस्थित होते. डिझेल पुरविणारी वाहने मोबाइल इंधन स्टेशन म्हणून काम करणार असून, आगारातून डिझेल घेऊन आणि गरजू शेतकऱ्यांना थेट पुरवतात. त्यामुळे इंधन स्थानकांकडे लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही. 

‘अॅग्रोवन’च्या वृत्ताची दखल 
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना इंधनासाठी येणाऱ्या अडचणींना ‘अॅग्रोवन’ने वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेने उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू केले. तातडीने यंत्रणा उभी करून घरोघरी डिझेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारेानाच्या प्रकोपानंतर संकटग्रस्त शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला उंचावण्यासाठी, राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...