Agriculture news in Marathi difficulties in Banana transport, procurement in Nandurbar district | Agrowon

नंदुरबार जिल्ह्यात केळीची वाहतूक, खरेदीबाबत अडचणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

नंदुरबार  : कोरोनामुळे संचारबंदी व वाहनांना जिल्हाबंदी केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. व्यापारी खरेदीस येत नसल्याने केळी झाडावरच पिकत आहेत.

नंदुरबार  : कोरोनामुळे संचारबंदी व वाहनांना जिल्हाबंदी केल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. व्यापारी खरेदीस येत नसल्याने केळी झाडावरच पिकत आहेत. वाढलेल्या तापमानामुळे केळी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागात सुमारे २० ते २५ कोटींच्या केळीचे नुकसान लॉकडाऊनमध्ये झाल्याचा
दावा शेतकरी करीत आहेत. 

जिल्ह्यातून केळी राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेशात पाठविली जाते. जिल्ह्यातील स्थानिक व्यापाऱ्यांसोबत या राज्यातील व्यापारी केळी खरेदीसाठी येतात. मात्र लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यापारी येणे बंद झाले आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरू असली तरी व्यापारी खरेदीसाठी यायला तयार नाही. केळी नाशवंत आहे. मोठ्या क्षेत्रात केळी
काढणीवर आहे. परंतु काढणी वेळेत न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची केळी झाडावरच किंवा बागेतच पिकली आहे. तिचे १०० टक्के नुकसान झाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात प्रतिदिन २५ ते २८ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत असते. मागील सात ते आठ दिवसात किमान २० ते २५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

केळीची पाठवणूक सुकर व्हावी, खरेदीदारांना विश्‍वास दिला जावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळले जावे यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे तळोदा तालुक्‍यातील शेतकरी दिगंबर माळी, संदीप मगरे, राजकपुर मगरे, भरत माळी, संदीप सूर्यवंशी, नितीन बाविस्कर आदींनी केली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...