agriculture news in marathi Difficulties in irrigating crops due to lack of electricity | Page 4 ||| Agrowon

विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले, त्यात दिवाळीच्या तोंडी बाजार समित्यांचे कामकाज बंद अशा अडचणीच्या काळात शेतकरी वीजबिल भरू शकत नसल्याची स्थिती आहे.

नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले, त्यात दिवाळीच्या तोंडी बाजार समित्यांचे कामकाज बंद अशा अडचणीच्या काळात शेतकरी वीजबिल भरू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यातच महावितरण कंपनीकडून पूर्वकल्पना न देता वीज जोडण्या खंडित करण्यात आल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यात अपेक्षित दाबाने वीजपुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. 

महावितरणने ग्रामीण भागात वीजजोडणी खंडित केल्याने शेतकऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विविध पक्ष व संघटना आक्रमक होत शेतकऱ्यांनी 
किमान दिवाळीपर्यंत वीजजोडण्या खंडित करू नये. अशी मागणी करण्यात आली होती. सध्या  पिकांना विजेअभावी पाणीपुरवठा करता येत नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा चांदवड बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिला आहे. 

कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत सांगितले, की दिवाळीनंतर वीज कनेक्शन तोडू असे वरिष्ठ अधिकारी व वायरमन सांगून गेले आहे. चांदवड तालुक्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु शासनाने नुकसानभरपाई मधून चांदवड तालुका वगळण्यात आलेल्या आहे. विम्याचे पंचनामे होऊन पंधरा दिवस झाले आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. मग वीजबिल भरणार कशी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मालेगाव तालुक्यातील काही भागात वीज जोडण्या खंडित करण्याचा प्रकार सुरू होता, मात्र राजकीय दबावामुळे तूर्तास हा प्रकार थांबला आहे. मात्र वीजपुरवठा अपेक्षित दाबाने होत नसल्याची तक्रार समोर येत आहे. काही ठिकाणी अद्याप हा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सटाणा, सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. देवळा तालुक्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होता. मात्र शेतकऱ्यांनी बिले भरल्यानंतर काही प्रमाणात त्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. येवला तालुक्यातील काही भागांत दिवाळीनंतर तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

प्रतिक्रिया: 
ढगफुटीमुळे सर्व पिके वाहून गेलेली आहे. पैसा येणार कुठून आणि त्यामध्ये ट्रान्सफार्मर कट करत आहे. जगावे की मरावे तेच कळत नाही. कृषिमंत्र्यांनी तत्काळ ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून वीजबिल तोडणी थांबावी. वीजबिल वसुलीला मुदतवाढ द्यावी. 
- सोमनाथ मगर, तालुकाध्यक्ष,
राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नांदगाव 

महावितरणच्या सुलतानी कारभारामुळे अक्षरशः हातातून पीक गेले. जसे कांदा बियाणे त्याच दिवशी पाणी दिले तरच उपयोग अचानक पंप चालू करायला गेल्यावर समजते लाइट कट आहे. पंप चालू नाही होणार बियाणे तर मातीत गेले. द्राक्ष छाटणी झाली; पाणी नाही कांदा लागवड अडचणीत आली आहे. 
- गणेश निंबाळकर, उपजिल्हाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना 


इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगाम अर्ध्यावर;...रिसोड, जि. वाशीम ः यंदाचा रब्बी हंगाम अर्ध्यावर...
अमरावती जिल्ह्यातील १९५९ गावांत...अमरावती : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील २ लाख...
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...