Difficulty in recurring 'Mahasal' due to lack of demand applications
Difficulty in recurring 'Mahasal' due to lack of demand applications

मागणी अर्जांच्या कमतरतेमुळे ‘म्हैसाळ’च्या आवर्तनात अडचणी

सांगली :  म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील ४५ हजार हेक्टरपैकी केवळ २७० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मागणी अर्ज केले आहेत. त्यामुळे आवर्तनाच्या नियमावलीनुसार अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या कोण सोडविणार आणि कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

गतवर्षी ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंपाद्वारे जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. गतवर्षी मिरज कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी १५४ दिवसांत सुमारे टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला होता. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत पावसाळ्यामुळे तिन्ही तालुक्यातील पाणीपातळीत वाढ झाली. दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणारे म्हैसाळचे अवर्तन या वर्षी मार्च पर्यंत बंद आहे.

म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गावोगावी जाऊन पाणीपट्टी वसुली आणि पाणी सोडण्याची मागणीची नोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेचे लाभक्षेत्रातील ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. लाभ क्षेत्रातील केवळ ०.६ टक्के क्षेत्रातील पाण्याची मागणी आली आहे. हा आकडा अत्यंत कमी आहे. मागणी अर्ज वाढले, तर आवर्तन लवकर सुरू करणे सुकर होईल.  

आवर्तनसाठी गरजे इतके पाण्याचे मागणी अर्ज अद्याप आले नाहीत. पण, भागातील पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे किती मागणी अर्जांची आणि किती दिवस खाते वाट पाहणार आहे? हा प्रश्न आहे. ही अडचण कशी मिटणार? शेतकरी अर्ज भरण्याची लगबग करतील काय? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यात तोडगा काढतील काय? याकडे आता लक्ष आहे.

यंदाचे अावर्तन पावसाळ्यापर्यंत  

गतवर्षीची ६० कोटीचे वीजबिल व पाणीबिलाची थकबाकी आहे. त्याची वसुली अवर्तन सुरू झाल्यानंतर सुरू केली जाईल. म्हैसाळचा विद्युतपुरवठा सुरू असून आवर्तन सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. सुरू होणारे आवर्तन पावसाळ्यापर्यंत चालणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com