agriculture news in marathi, The difficulty of soyabean malani in Khandesh | Agrowon

ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला अडचण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन मळणीवर परिणाम झाला आहे. पीक कापणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कापणी पूर्ण झाली आहे. परंतु दाणे पुरेसे कोरडे नसल्याने मळणीला अडचणी येत आहेत.

जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन मळणीवर परिणाम झाला आहे. पीक कापणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कापणी पूर्ण झाली आहे. परंतु दाणे पुरेसे कोरडे नसल्याने मळणीला अडचणी येत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा भागात अधिकची पेरणी झाली होती. धुळे जिल्ह्यात शिरपुरात अधिक पेरणी झाली होती. नंदुरबारात शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्‍यांत अधिक पेरणी झाली आहे. पिकाला हव्या त्या वेळी पावसाचे पाणी न मिळाल्याने हवे तसे उत्पादन येत नसल्याची स्थिती आहे. परंतु आता हाती आलेल्या पिकाची मळणी करण्यापूर्वी प्रतिकूल वातावरण आहे. तळोदा भागात काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मळणी झाली आहे.

पावसाच्या आगमनाबाबत अंदाज येत असल्याने शेतकऱ्यांनी कापणी थांबविली आहे. कापणीनंतर पाऊस आल्यास नुकसान अधिक होते. दाणे फुगून फुटतात. त्यांचा दर्जा घसरतो. तसेच ते अंकुरतात. कापणी झालेले सोयाबीन वाळण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वातावरण नाही. त्यामुळे दाणे कोरडे होत नसल्याची स्थिती आहे. दाणे पक्व नाहीत म्हणून यंत्रचालक मळणी करू देत नाहीत. कारण त्यामुळे मळणी यंत्राचे नुकसान होण्याची शक्‍यता असते. यामुळे सोयाबीन मळणी लांबत असून, सुरवातीच्या बऱ्यापैकी असलेल्या दरांचा लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याची स्थिती आहे. खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी काहीशी वाढली होती. एकूण क्षेत्र सुमारे ४० हजार हेक्‍टर असल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...