‘सकाळ’ला डिजिटल मीडियातील जागतिक पुरस्कार

चेन्नई ः वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्सने (वॅन-इफ्रा) जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस्‌’मध्ये सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार ‘सकाळ’ला प्रदान करण्यात आला.
चेन्नई ः वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्सने (वॅन-इफ्रा) जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस्‌’मध्ये सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार ‘सकाळ’ला प्रदान करण्यात आला.

चेन्नई : डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ’सकाळ माध्यम समूह’ दक्षिण आशियात अग्रेसर ठरला आहे. वृत्तपत्र माध्यमांची जागितक संघटना द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्सने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस्‌’मध्ये ‘सकाळ’चा गौरव करण्यात आला.

सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार ‘सकाळ’ला शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. चेन्नईमध्ये ‘वॅन-इफ्रा इंडिया २०१७’ परिषद सुरू आहे. या परिषदेत ‘वॅन-इफ्रा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेर्फेल आणि ‘वॅन-इफ्रा साउथ एशिया’चे कार्यकारी संचालक मगदूम मोहंमद यांच्या हस्ते ‘सकाळ माध्यम समूहा’ला हा पुरस्कार वितरित करण्यात आला.

‘सकाळ’ समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार आणि ‘सकाळ’च्या डिजिटल विभागाचे मुख्य उपसंपादक गौरव दिवेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा ‘वॅन-इफ्रा’ पुरस्कार मिळवणारा ‘सकाळ’ हा मराठी वृत्तपत्रसृष्टीमधील पहिला माध्यम समूह ठरला आहे.

या पुरस्कारामुळे सोशल मीडियाद्वारे सर्वोत्तम संवाद साधणाऱ्या जगभरातील निवडक माध्यम समूहांमध्ये ‘सकाळ’चा समावेश झाला आहे.

esakal.com ही मराठी ऑनलाइन जगतात लोकप्रिय असलेली ‘सकाळ’ समूहाची वेबसाइट, फेसबुकवरील facebook.com/SakalNews या दहा लाखांवर फॉलोअर्स असणाऱ्या पेजसह युट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांमध्ये ‘सकाळ’ने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली.

पुरस्कारासाठी दक्षिण आशियामधील वृत्तपत्रे स्पर्धेत होती. आंतरराष्ट्रीय पॅनेलने पुरस्कारासाठी परीक्षण केले. सोशल मीडिया युजर्सशी ‘सकाळ’ सातत्याने प्रभावी संवाद करत आहे. बिनचूक आणि वेगवान बातम्या, विविध विषयांवर मत-मतांतरे मांडणारे लेख आणि व्हिडिओंसाठी दररोज हजारो नेटिझन्स esakal.com वेबसाइटला भेट देतात.

ऑनलाइन वाचक दररोज प्रतिक्रिया, शेअरिंग, मेसेज आदी माध्यमांतून आपली मते, सूचना ‘सकाळ’कडे मांडत असतात. या संवादातून ‘सकाळ’शी जोडल्या गेलेल्या ऑनलाइन वाचकांची संख्या दर महिन्याला वाढत आहे. त्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. esakal.com सह तीसहून वेबसाइट्‌स आणि मोबाईल ॲप्सद्वारे ‘सकाळ माध्यम समूह’ ऑनलाइन वाचकांना सेवा पुरवत आहे.

पुरस्कार देणारी ‘वॅन-इफ्रा’ संस्था जगभरातील वृत्तपत्र माध्यमांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झाली आहे. जगभरातील १२० देशांमधील तीन हजार प्रसारमाध्यमे आणि १८ हजारांवर वृत्तपत्रे, नियतकालिके या संस्थेचे सभासद आहेत. ‘सकाळ’ डिजिटल वेबसाइट www.esakal.com सोशल मीडिया facebook.com/SakalNews twitter.com/eSakalUpdate instagram.com/eSakalPhoto youtube.com/user/ sakaalpapers ॲप Sakal Marathi News (अँड्रॉइड) Sakal Marathi News (iOS) सिटिझन जर्नालिझम सकाळ संवाद (अँड्रॉइड, iOS ॲप)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com