agriculture news in Marathi digital platform for control corona Maharashtra | Page 2 ||| Agrowon

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म' 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर’ ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

मुंबई: करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर’ ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरे क्वारंटाइन ट्रॅकिंग होय. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचे ट्रेसिंग. अशा व्यक्तीने स्मार्टफोन बाळगला असल्यास त्याच्याआधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचे ट्रेसिंग करणे या ॲपमुळे शक्य होणार आहे.

शिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचे ट्रेसिंगही महाकवच अॅपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता 'महाकवच'मुळे प्रशासनाला करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत. 

महाकवच प्लॅटफॉर्मचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, करोना पॉझिटिव्ह रुग्ण, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान १४ दिवस स्वतःचे विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक असते. पण, बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात.

त्यामुळेच करोनाचा संसर्ग वाढत जातो. पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इनस्टॉल केले जाईल तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स होय. 

अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा ॲपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या ॲपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल. 

महाकवच ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते केवळ करोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नाही. याचबरोबर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून ‘सेल्फ असेसमेंट टूल’चीही निर्मिती करण्यात आली असून ते लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. 

या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी - भारत सरकार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी - महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. 

सध्या नाशिकमध्ये वापर 
सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नाशिक प्रशासनात त्याचा वापर सुरु आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येईल. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि समाजातील अनेक मंडळी करोनाविरुद्धची ही लढाई लढत आहेत. आता या व्यापक लढ्याला या प्लॅटफॉर्ममुळे एक अत्यंत वेगळा असा डिजिटल प्रयत्नही जोडला जात आहे. करोनाला प्रतिबंध करण्यात याची महत्त्वाची भूमिका असेल. 
 


इतर ताज्या घडामोडी
चांगल्या बाजारभावाच्या संधीसाठी...कांदा साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि २५...
आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...
भुईमूग काढणीवेळी घ्यावयाची काळजीभारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
पुणे बाजार समिती मुख्य आवार रविवारपासून...पुणे : गुलटेकडी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट...
पूर्व मोसमी पावसाची शक्‍यता, तापमान...कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
पिकावर परिणाम करणारे हवामानातील विविध...स्थानिक हवामानानुसार लागवडीसाठी योग्य पिकांची...
कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन...नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे २५...
राज्यातील लॉकडाउनबाबत उद्या बैठकमुंबई : केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनचे...
नायगावात कोट्यवधीचा कापूस आगीमुळे खाक नांदेड : जिल्ह्यातील नायगाव येथील भारतीय कापूस...
शेतकऱ्यांनी न खचता सज्ज राहावे ः...परभणी : ‘‘मराठवाड्यातील शेती पुढे अनेक समस्‍या...
बीड विभागात कापसाची १६ लाख ११ हजार...बीड : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची साथ...
जळगावात पीक कर्जवाटपाबाबत नुसत्याच...जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
मराठवाड्यात ३२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा...औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील...
आधुनिक लागवड तंत्रज्ञान स्विकारा ः डॉ....अर्धापूर, जि.नांदेड : ‘‘सोयाबीन हे एक महत्त्वाचे...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार...सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा...
सोलापुरात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष...सोलापूर ः जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती...
‘ॲग्रो ॲम्ब्युलन्स’द्वारे पिकांवरील...नाशिक : मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान...
सांगलीत शेतकरी अपघात विम्याचे २७३...सांगली ः शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू, अवयव निकामी...