वीजग्राहकांच्या आधुनिक सेवेसाठी ‘डिजिटल सेक्शन’

 'Digital Section' for the modern service of electricity consumers
'Digital Section' for the modern service of electricity consumers

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल अंतर्गत सर्व शाखा कार्यालयांमध्ये आनलाइन तंत्रज्ञान व मोबाईल अॅप्सचा वापर वाढ व प्रोत्साहित करण्यासाठी ‘डिजिटल सेक्शन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रजासत्ताकदिनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्टपणे वापर करणाऱ्या मंडळनिहाय पहिल्या तीन क्रमाकांच्या शाखा कार्यालयांना बक्षिसे व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

वीजग्राहकांना आधुनिक ग्राहक सेवेसोबतच महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाजदेखील ऑनलाइन झालेले आहे. यासाठी महावितरणने एम्लॉई पोर्टल आणि नवीन वीजजोडणी, मीटर रिडींग तसेच कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी ‘कर्मचारी मित्र’ अशा स्वतंत्र अॅप्सची निर्मिती केली आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा दैनंदिन व परिपूर्ण वापर करून वीजग्राहकांना जलद व तत्पर सेवा देणाऱ्या कार्यालयांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

परिमंडलातील ३५१ शाखा कार्यालयांसाठी ‘डिजिटल सेक्शन’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महावितरणच्या कार्यालयीन कामांसाठी असलेल्या विविध ऑनलाइन प्रणाली व मोबाईल अॅप्सचा वापर, त्याद्वारे ग्राहकांना दिलेली जलद सेवा, एम्प्लॉई पोर्टलचा वापर, अॅप्सद्वारे नवीन वीजजोडणी, वीजपुरवठा खंडित करणे व पूर्ववत करणे याची मोबाईल अॅपद्वारे नोंद, ग्राहकांचे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी आदी इतर निकषांच्या आधारे मंडळनिहाय बक्षिस व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

डिजिटल कार्यालयांचा करणार गौरव ‘डिजिटलाईज ऑफिस’ या संकल्पनेव्दारे ज्या शाखा कार्यालयातील सर्व कर्मचारी मोबाईल अॅप व इतर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणाचा या स्पर्धेतील मुख्य निकष आहे. अशा कार्यालयांना ‘डिजिटल सेक्शन’ म्हणून तसेच ज्या उपविभागामधील सर्व शाखा कार्यालये ‘डिजिटलाईज’ झाल्यास त्या कार्यालयास ‘डिजिटल सबडिव्हीजन’ म्हणून घोषित केले जाईल  व त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. 

नाशिक परिमंडलअंतर्गत नाशिक व नगर जिल्ह्यांतील सर्व शाखा कार्यालयांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या १० जानेवारी २०२० पर्यंत नाशिक येथील औद्योगिक संबंध विभागाच्या dcironashik@gmail.com या ईमेलवर स्पर्धेतील सहभागाची नोंदणी करावी. या स्पर्धेत सर्वच शाखा कार्यालयांनी सहभागी व्हावे. - श्री. ब्रिजपालसिंह जनवीर,  मुख्य अभियंता, नाशिक परिमंडल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com