स्वच्छतेच्या प्रसारासाठी फिरणार डिजिटल व्हॅन

स्वच्छतेच्या प्रसारासाठी फिरणार डिजिटल व्हॅन
स्वच्छतेच्या प्रसारासाठी फिरणार डिजिटल व्हॅन

सोलापूर  : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यात डिजिटल व्हॅन सुरू करण्यात अली आहे. जिल्हा परिषदेत या व्हॅनचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ही स्वच्छता व्हॅन जिल्ह्यातील १५० गावांत फिरणार आहे. 

व्हॅनच्या उद्‌घाटनावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, पक्षनेते आनंद तानवडे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, सचिन देशमुख, रेखा राऊत, स्वाती कांबळे, रोहिणी मोरे, अण्णाराव बाराचारे, श्रीमंत थोरात, बाळासाहेब देशमुख, सचिन शिवशरण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते. 

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. जिल्ह्यात पायाभूत सर्वेक्षणातून वगळलेल्या कुटुंबांची स्वच्छतागृहे पूर्ण करण्यासाठी व स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी १५० ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेविषयी चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

स्वच्छतागृहाचा वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे हे ग्रामपंचायतींसमोर आव्हान आहे. ते पेलण्यासाठी स्वच्छतागृहाची भूमिका महत्त्वाची असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

या वेळी लेखाधिकारी अर्चना कसबेकर, सचिन सोनवणे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, महादेव शिंदे उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज, वडाळा, कोंडी, कौठाळी, डोणगाव, हिरज, मार्डी, कारंबा, गावडी दारफळ, अकोलेकाटी, पाथरी, हिप्परगा, खेड या गावातून डिजिटल व्हॅन फिरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com