दिलीप सोपलांचंही अखेर ठरलं...

दिलीप सोपलांचंही अखेर ठरलं...
दिलीप सोपलांचंही अखेर ठरलं...

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही पक्षबदलाचा आपला निर्णय सोमवारी (ता. २६) कार्यकर्त्यांसमोर जाहीर केला, त्यासाठी शिवसेनेची निवड त्यांनी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही त्यांना संमती दिली, त्यानुसार येत्या बुधवारी (ता. २८) श्री. सोपल मुंबईत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश करतील. आपल्या या प्रवेशाबाबतची माहिती स्वतः आमदार सोपल यांनी पत्रकारांना दिली. 

काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी सोलापुरात आले होते, तेव्हा आमदार सोपल अनुपस्थित होते, तेव्हाच त्यांच्या पक्षबदलाची चर्चा सुरू होती. या मुलाखतीदरम्यानही श्री. पवार यांना पत्रकारांनी सोपलांच्या अनुपस्थितीबाबत विचारता, अशी शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतरही आमदार सोपल स्पष्ट बोलले नव्हते. वेळ आली की सांगू, असे म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे नुसतेच तळ्यात-मळ्यात सुरू होते; पण गेल्या पाच-सहा दिवसांपासून मात्र त्यांच्या पक्षबदलाच्या घडामोडी वेगाने घडल्या. सोमवारी बार्शीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्या वेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या होमध्ये हो मिसळत या प्रवेशाला संमती दिली. कार्यकर्त्यांच्या भावना आणि सध्याची बदलती परिस्थिती पाहूनच आपण हा निर्णय घेतल्याचे आमदार सोपल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

काँग्रेसचे माजी आमदार मानेही शिवसेनेत  दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली आहे. त्यांचाही प्रवेश आमदार सोपल यांच्यासमवेत बुधवारी (ता. २८) होणार आहे. आपल्याला कोणतीही अपेक्षा नाही. पक्ष जो निर्णय देईल, तो आपण मान्य करू, राज्यातील कोणत्याही मतदारसंघात लढायला सांगितले तरी आपण लढू, असेही श्री. माने म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com