agriculture news in Marathi Dilip zende on quality control director Maharashtra | Agrowon

गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडे

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडे यांची नियुक्ती झाली आहे. कायमस्वरूपी संचालकपदाच्या पदोन्नती प्रक्रिया अपूर्ण आहेत. त्यामुळे झेंडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

पुणे: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडे यांची नियुक्ती झाली आहे. कायमस्वरूपी संचालकपदाच्या पदोन्नती प्रक्रिया अपूर्ण आहेत. त्यामुळे झेंडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 

आधीचे गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे निवृत्त झाल्याने या पदासाठी प्रचंड चुरस होती. कृषी खात्यातील अत्यंत अभ्यासू तसेच सर्व विभागांची बारकाईने माहिती असलेला अधिकारी म्हणून श्री. झेंडे परिचित आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते राज्यात सर्व प्रथम आल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागात पीक संरक्षण अधिकारी म्हणून झाली. 

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातून कीटकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या झेंडे यांनी कृषी खात्यात २९ वर्षे सेवा केली आहे. राज्याच्या बियाणे, खते व कीटकनाशके उद्योगातील प्रशासकीय तसेच तांत्रिक घडामोडींचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. सध्या पुणे कृषी सहसंचालकपदी कार्यरत असलेल्या झेंडे यांनी खात्यांतर्गत अनेक महत्वाच्या पदांवर कामे केली आहेत. 

कृषी आयुक्तालयात अतिशय महत्वाच्या राज्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारिपदी झेंडे यांनी चार वर्षे उत्तम काम केले. याच कालावधीत त्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके उद्योगाशी संबंधित यंत्रणांची तांत्रिक घडी बसवली.  पुढे फलोत्पादन अभियानात प्रकल्प व्यवस्थापक आणि त्यानंतर पुण्याचे कृषी सहसंचालक म्हणून झेंडे यांनी उत्तम कामगिरी बजावली. सध्या शासनाने त्यांना प्रक्रिया व नियोजन संचालकपदाचा देखील जादा पदभार दिला आहे.


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...