परराज्यातील ४५० कामगारांची प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था

सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील सुमारे साडेचारशे कामगारांची निवारा आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. तामिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश येथील विविध कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
Dining arrangements for administration of 450 workers in the State
Dining arrangements for administration of 450 workers in the State

सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील सुमारे साडेचारशे कामगारांची निवारा आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. तामिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश येथील विविध कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूर आणि शहर परिसरातील विविध औद्योगिक वसाहतीमध्ये परराज्यातील कामगार नोकरीस आहेत. तामिळनाडू येथील सुमारे दीडशे कामगार जुळे सोलापूर येथील राघवेंद्रनगर येथे राहतात. त्यांना स्वयंसेवी संस्थेमार्फत तयार अन्न व धान्यपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वळसंग येथील जीआर इंफ्रा कंपनीच्या परिसरात राजस्थान आणि मध्यप्रदेशातील सुमारे १७५ कामगार वास्तव्यास आहेत. त्यांना कंपनीमार्फत अन्न पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मंद्रुप येथील आयजी एम कंपनीत राजस्थान येथील १०० कामगार आहेत त्यांनाही कंपनीमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरातील सिकची धर्मशाळेलाही निवारा गृह म्हणून जाहीर करण्यात आला आहे. येथेही निराधारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कोणी निराधार आढळल्यास श्रीमती वैशाली आव्हाड (९१५८८८५६७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

राष्ट्रीय महामार्गावरुन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालक आणि सहाय्यकांना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भोजन आणि पाणी वितरण करण्यात येत आहे. त्याची ठिकाणे आणि भोजनाची व्यवस्था करणाऱ्या कंपनीचे नाव पुढीलप्रमाणे - १) एलपीजी प्लॉन्ट एफ ५, चिंचोली एमआयडीसी, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेशन २) सुनील हॉटेल, चिंचोली एमआयडीसी, सोलापूर, भारत पेट्रोलियम ३) हैदराबाद संगा रेडी रोड, श्री. पुरणमल भगवानचंद माली ४) नांदणी - विजापूर रोड, सिद्धेश्वर साखर कारखाना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com