agriculture news in Marathi direct agri produce sell till 10 crore rupees Maharashtra | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री उलाढाल १० कोटींच्या उंबरठ्यावर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

 कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संकल्पना पुढे आली. २९ मार्चपासून थेट विक्री आजअखेर दहा कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संकल्पना पुढे आली. २९ मार्चपासून थेट विक्री आजअखेर दहा कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकावा म्हणून शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना पुढे आली. त्या आठवडे बाजारात औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १८ ते २० शेतकरी गटांनी व काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत जवळपास चार वर्षांपासून शेतमाल थेट ग्राहकांना विकला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भाजीपाला व फळांची थेट विक्री करण्याची संकल्पना पुढे आली. कृषी विभागासह आत्मा व महसूल, सहकार, पोलिस आदी विभागांच्या समन्वयातून २९ मार्चला औरंगाबाद शहरात थेट विक्री सुरू झाली.

सुरुवातीला जवळपास २१ शेतकरी गट व शेतकऱ्यांनी फळे, भाजीपाल्यासह धान्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दाखविली. आता विविध शेतकरी गट, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आदी मिळून जवळपास ७७ वर संख्या पोचली आहे. औरंगाबाद शहरात होत असलेली विक्री आता तालुका स्तरावर व ग्रामीण भागातील महत्त्वांच्या छोट्या मोठ्या गावांत पोचली आहे. 

ग्राहकांना मोठी विक्री
थेट विक्री साखळीतून आत्तापर्यंत ६९ लाख ६९ हजार सातशे पाच किलो भाजीपाला तर ४० लाख ४५ हजार २७६ किलो फळांची औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गाव व शहरातील ग्राहकांना थेट विक्री करण्यात आली आहे. या थेट फळे भाजीपाला विक्रीतून झालेली उलाढाल आजच्या घडीला ९ कोटी ९७ लाख ५४ हजार ६५५ रुपयांवर पोचली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...