Agriculture news in marathi Direct to farmers in Solapur Will disburse the loan | Agrowon

सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सध्या सुधारत आहे. बँकेच्या वतीने यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांना थेट कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी दिली. 

सोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून अडचणीत आलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सध्या सुधारत आहे. बँकेच्या वतीने यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांना थेट कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी दिली. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील लोकनेते बाबूरावअण्णा पाटील सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी प्रशासक शैलेश कोतमिरे होते. सभेत त्यांनी या निर्णयांची माहिती दिली. 

कोतमिरे म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत बँकेची स्थिती अडचणीची होती. त्यामुळे कर्ज वाटप झाले नव्हते. त्यामुळे बँकेकडील सभासद व कर्जदार शेतकरी राष्ट्रियकृत, खासगी बँकेकडे गेला होता. तो परत जिल्हा बँकेकडे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार २६५ सोसायट्यांपैकी ज्या निकषात बसणाऱ्या ३३४ सोसायट्या होत्या, त्यांच्या मार्फत एक लाखापर्यंतचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यापासून घेतला होता.

आतापर्यंत सर्व प्रकारे ६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. पण या सोसायट्या संपूर्ण जिल्ह्यात नसल्याने अचडणी येत होत्या. आता थेट कर्ज वाटपामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होणार आहेत.’’ सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यवस्थापक के. आर. पाटील यांनी आभार मानले.

उत्पन्नासाठी वाढवले पर्याय
बँकेने जेएलजी, रिटेल फायनान्स, पगारदार नोकरांना वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, लाइव्ह स्टॉक फायनान्स अशा विविध कर्ज योजेनांतून कर्ज वितरण करून बँकेच्या उत्पन्नात वाढ केली. तसेच बँक पातळीवर शंभर टक्के व संस्था पातळीवर पन्नास टक्के व त्यापेक्षा जास्त वसुली आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 

तीन लाखांचे कर्ज मिळणार
बँकेमार्फत शेतकऱ्यांना थेट पद्धतीने अल्प मुदत पीक कर्जपुरवठा करण्याचे धोरण राबविण्याचे निश्चित करीत आहोत. जिल्हा बँकेच्या एकूण २०८ शाखा आहेत. त्या सर्व शाखांमधून कर्ज वाटप करण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव पाठवला आहे. येत्या आठ दिवसांत निर्णय होईल. त्यानंतर थेट कर्ज वाटप सुरू होईल. या माध्यमातून तीन लाखांपर्यंतचे कर्ज थेट शेतकऱ्यांना मिळू शकेल, असेही ते म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...